मुंबई : २४ नोव्हेंबर – राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून हिरवा कंदील असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
टास्क फोर्स सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यात पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सुरू करावेत. मात्र शाळा सुरू करताना गुगली नियमांचे काटेकोरपणे पालन होईल याबाबत दक्षता ठेवावी लागेल. अशा सूचना टास्क फोर्स कडूनही करण्यात आले आहेत. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेतील असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले.
तसेच 12 ते 18 वयोगटातील मुलांना लवकरात लवकर लसीकरण करण्याबाबत टास्क फोर्सने सूचना केल्या आहेत. याबाबत उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही राजेश टोपे यांनी वर्तवली.
12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी कोरेक्स लस वापरण्यात यावी अशा बाबतचे मत तज्ञांनी व्यक्त केला आहे. राज्यात मुबलक पुरवठा असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर 12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही राजेश टोपे यांनी केली आहे..