अहमदनगर। प्रतिनिधि। 13 फेब्रुवारी
– संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात सरपंचपदाच्या शपथविधीसाठी जलिंदर गागरे यांनी हेलिकॉप्टरद्वारे हजेरी लावल्याचे दिसून आले. जल्लोषात स्वागत आटोपल्यानंतर त्यांची 12 बैलांच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली असून, यानंतर शपथविधी पार पडला.
गावातील तरुण द्योजक जालिंदर गागरे यांचे पुण येथे विविध उद्योग आहते. आपल्या गाव परिसरातील तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. ते पुण्यात वास्तव्यास असले तरी त्यांची गावाशी नाळ जुललेली आहे. गावाचा सर्वांगिण विकास करण्याच्या हेतूनेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि संपूर्ण 9 सदस्यांचे पॅनल बहुमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरुष गटाचे असल्याने त सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले. गावाकडे चला, हा नारा महात्मा गांधीजींनी दिलाहोता. त्याच ध्येयाने मी निवडणूक लढवली. आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी हेलिकॉप्टरने आल्याचे गागरेयांनीसांगितले. दुसरीकडे गावाचा विकास करण्याचा ध्यासअसलेला सरपंच लाभल्याने गावकर्यांनीही आनंद व्यक्त केला.