गोंदिया: अदानी फाउंडेशनतर्फे तिरोडा तालुक्यातील १० गावांत महाआरोग्य शिबिर; २,७४४ रुग्णांनी घेतला लाभ

94 Views

​प्रतिनिधि। 17 जनवरी
तिरोडा। अदानी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून तिरोडा तालुक्यातील विविध ग्रामीण भागांत मोफत कॅन्सर तपासणी आणि मल्टी स्पेशालिटी आरोग्य निदान व उपचार शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण १० भव्य शिबिरांच्या माध्यमातून २,७४४ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार पुरविण्यात आले.
​अदानी पॉवरचे प्रमुख श्री. मयंक दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अदानी फाउंडेशनचे प्रमुख श्री. बिमूल पटेल यांच्या नेतृत्वात हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत तज्ञ आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा या शिबिरांचा मुख्य उद्देश होता.

​या गावांमध्ये झाले आयोजन..
​हे आरोग्य अभियान तालुक्यातील बिर्सी, मरारटोला, पालडोंगरी, मलपुरी, खडकी, खमारी, कवलेवाडा, खैरबोडी, बेर्डीपार आणि गराडा या गावांमध्ये राबविण्यात आले. या प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

​तज्ञ डॉक्टरांद्वारे निदान व उपचार
सदर शिबिरामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल नागपूर व सहयोग हॉस्पिटल गोंदिया येथील तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती​ यात प्रामुख्याने खालील सुविधा देण्यात आल्या:

​कर्करोग तपासणी: मुख कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशय कर्करोग व इतर कर्करोगांचे तज्ञांकडून विशेष निदान.
​तज्ञ डॉक्टर: सामान्य रोग विशेषज्ञ, बालरोग विशेषज्ञ, नेत्ररोग विशेषज्ञ, अस्थिरोग विशेषज्ञ आणि स्त्रीरोग तज्ञांनी रुग्णांची सखोल तपासणी केली.
​मोफत सेवा: रुग्णांना केवळ तपासणीच नाही, तर आवश्यक औषधोपचारही मोफत उपलब्ध करून देण्यात आले.
​अदानी फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरात न जाता दर्जेदार आरोग्य सेवा मिळाली आहे. आरोग्याप्रति जनजागृती आणि वेळीच निदान झाल्यामुळे अनेक गंभीर आजारांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा विश्वास अदानी समूहातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Related posts