गोंदिया। आज 02 अक्तूबर राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर व माजी प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन व उपस्थितांकडून साजरी करण्यात आली. यावेळी श्री राजेंद्र जैन यांनी थोर महात्म्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून अभिवादन केले व सर्व समाज बांधवांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या व विजया दशमीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, विनोद हरिनखेड़े, अशोक सहारे, टी एम पटले, मोहन पटले, मनोहर वालदे, माधुरी नासरे, राजू एन जैन, विनीत सहारे, खालिद पठान, शर्मिला पाल, वर्षा बैस, पुष्पा वैद्य, रवि मूंदड़ा, संजीव राय, हरि आसवानी, करण टेकाम, माणिक पड़वार, रामु चूटे, सुनील पटले, सौरभ जैस्वाल, राहुल अग्रवाल, तुषार उके, कपिल बावनथड़े, रौनक ठाकुर, त्रिलोक तुरकर, शरभ मिश्रा, तोमिचंद कापसे, कुणाल बावनथड़े, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे, वामन गेडाम सहित अन्य उपस्थित होते.