भंडारा: मा. आमदार राजेन्द्र जैन यांच्या उपस्थितीत गोंडेगाव सरपंच धर्मेद्र बोरकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश..

50 Views

 

भंडारा। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जनसंपर्क कार्यालय, भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व खासदार मा श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ग्राम गोंडेगाव (ता. लाखनी) चे सरपंच श्री. धर्मेद्र बोरकर यांनी आपल्या समर्थकांसह माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुद्धे यांच्या उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा वापरून अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशामुळे गोंडेगाव व परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनाधार अधिक मजबूत होणार असून स्थानिक पातळीवर विकास व जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे श्री. धर्मेद्र बोरकर यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय सचिव मा.श्री. राजेंद्रजी जैन, जिल्हाध्यक्ष श्री. नानाभाऊ पंचबुध्दे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. सुनिलभाऊ फुंडे, प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते श्री.देवेंद्रनाथ चौबे, जि.प. उपाध्यक्ष श्री. एकनाथ फेंडर, अड. श्री. विनयमोहन पशिने, भंडारा तालुकाध्यक्ष नरेंद्र झंझाड, भंडारा दुध संघाचे संचालक हितेश सेलोकर, जि.प. सदस्य रजनिश बन्सोड, प्रदेश सेवादलचे उपाध्यक्ष श्री. शेखर (बाळाभाऊ) गभने, विजय खेडीकर, सुभाष तितिरमारे, निरज शहारे, शरद इटवले, तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts