जिल्हयात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करा- माजी आमदार राजेन्द्र जैन

121 Views

 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी..

गोंदिया। आज खासदार प्रफुल पटेल यांच्या सूचनेनुसार माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिष्टमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन यांना जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे गोंदिया जिल्हयातील धान, मक्का, भाजीपाला, फळबागे तसेच गाव खेडयामध्ये मोठया प्रमाणावर मातीचे घरे व गुरांचे गोठे यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन सरसकट तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत करावी याबाबतचे निवेदन देण्यात आले.

मागील काही दिवसांपासून गोंदिया जिल्हयात होत आललेल्या अवकाळी पावसामुळे व गारपिटी मुळे ग्रामीण व शहरी भागातील मोठ्या प्रमाणात घरे व गुरांची गोठे क्षतिग्रस्त होऊन नुकसान झाले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्हयात धानाचे पिक मोठया प्रमाणावर असुन धान पिकाची नुकसान झालेली आहे. तसेच जिल्हयातील अनेक शेतकरी नगदी पिके म्हणून भाजीपाल्याची लागवड सुध्दा केलेली आहे. परंतु काही दिवासापासून सातत्याने अवकाळी पाऊस होत असल्याने धान, भाजीपाला व अन्य नगदी पिकांचे अतोनात नुकसान झालेले असुन शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे तातडीने करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी, गोंदिया यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री महाराष्ट्र शासन, मुंबई यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना प्रामुख्याने माजी आमदार श्री राजेन्द्र जैन, श्री बाळकृष्ण पटले, श्री कुंदन कटारे, श्री सुरेश हर्षे, सौ पूजा अखिलेश सेठ, श्री जगदीश बावनथडे, सौ. अश्विनी रवी पटले, श्री शिवलाल जमरे, श्री नानू मुदलियार, श्री अखिलेश सेठ, श्री नीरज उपवंशी, सौ. कीर्तीताई पटले, सौ. सरलाताई चिखलोंडे, श्री रवी पटले, श्री शंकरलाल टेम्भरे, श्री नितीन टेम्भरे, श्री पंकज चौधरी, श्री सुनील पटले, श्री लीकेश चिखलोंडे, श्री शिवलाल नेवारे, श्री चुन्नीलाल शहारे, श्री राकेश वर्मा, श्री रौनक ठाकूर, श्री संजय चौरे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts