लोकसभा निवडणूक: जिल्ह्यात पोलीस प्रशासन सज्ज…..चोख पोलीस बंदोबस्त तैनात.

238 Views
        सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोंदिया, निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, नित्यानंद झा, गोंदिया यांचे संपूर्ण देखरेखीखाली गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पाडण्याकरिता कायदा सुव्यवस्था, शांतता अबाधित राखण्यासाठी, चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे…
▶️ गोंदिया जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र संख्या- 1288
▶️ एकूण क्रिटिकल मतदान केंद्र -112
 ▶️ गोंदिया जिल्हा पोलीस बंदोबस्त –
1) एकूण वरीष्ठ पोलीस अधिकारी-09
2) एकूण पोलीस अधिकारी- 97
 3) एकूण पोलीस अंमलदार/कर्मचारी बंदोबस्त -1916
 4) एकूण होमगार्ड बंदोबस्त-1393
5) केंद्रीय पोलीस बल बंदोबस्त एकूण- 15 कंपन्या
नक्षल प्रभावित भागात पोलीसांची राहणार विशेष नजर…. 
चोख पोलीस बंदोबस्त तैनात- नक्षलग्रस्त भागातील एकूण 6 पोलीस स्टेशन, 11 सशस्त्र दूरक्षेत्र अंतर्गत मतदान केंद्रावरील, केंद्राबाहेर संरक्षण, परिसर बंदोबस्त करीता – पोलीस स्टेशन, सशस्त्र दूरक्षेत्र स्तरावर पोलीस स्टाफ तैनात करण्यात आले आहे… C-60 पार्ट्या, SAG पार्ट्या., केंद्रीय पोलीस बल, राज्य राखीव पोलीस दल, इत्यादी द्वारे बंदोबस्तावर चोख लक्ष राहणार …
अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.. –
       संपूर्ण जिल्हास्तरावर वेळीच उद्भवणाऱ्या घटना परिस्थिती संबंधाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष येथे, तर जिल्ह्यातील 4 पोलीस उपविभाग स्तरावर आणि 16 पोलीस ठाणे अंतर्गत स्तरावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे….कायदा, सुव्यवस्था शांतता रखण्याकरीता अतिरिक्त पोलिस फोर्स रिझर्व ठेवण्यात आलेले आहे…

Related posts