रिपोर्टर। 22 आगस्ट
गोंदिया। गोंदिया जिल्ह्यात चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकाद्वारे शोध मोहीम हाती घेवून गुन्हेगारांना जेरबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
या अनुषंगाने पुलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पुलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध करीत असताना गुप्त बातमीदार कडून प्राप्त माहितीच्या आधारे मो. सा. चोरी करणारा गुन्हेगार नामे- निलेश नारायण सुलाखे, वय 19 वर्षे राहणार- धापेवाडा, पोस्ट- कुम्हारी, जिल्हा बालाघाट
यास धापेवाडा जि. बालाघाट येथून दिनांक 18/08/2023 रोजी ताब्यात घेऊन मो. सा. चोरी बाबत विचारपूस केली असता त्यांनी बालाघाट, येथुन गाड्या चोरी करून विक्रीकरीता टी. बी. टोली गोंदिया परिसरात लपवून ठेवल्याचे सांगितल्याने त्याचे ताब्यातून जिल्हा बालाघाट (मध्य प्रदेश) येथील दाखल अप. क्रं. 328/2023 कलम 379 भा.दं.वि. गुन्ह्यातील
1). हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. MP 50 ML 8070 व
2) होंडा शाइन मो.सा. क्र. MP 40 BX 3707 अश्या दोन मो. सा. हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या असून आरोपीसह जप्त मो. सा. बालाघाट कोतवाली पोलिसांचे स्वाधिन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे गुप्त बातमीदारकडून प्राप्त माहिती नुसार मो.सा. चोरी करणारे गुन्हेगार नामे—
1) अमन मनोज शेंडे वय 20 वर्ष रा. गडडाटोली गोंदिया
2) राकेश हरिचंद पराते वय 23 वर्ष रा. संजय नगर, शास्त्री वार्ड गोंदिया
3) शुभम विक्की राउत वय 23 वर्ष रा. सेलटॅक्स कॉलोनी गोंदिया यांना दिनांक 21/08/2023 रोजी गड्डाटोली येथून ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून ..
हिंगणा जिल्हा नागपूर गुन्ह्यातील —
1) हिरो होंडा पॅशन प्रो . मो.सा. क्र. MH 40 SR 6828 आमगाव जिल्हा गोंदिया अप क्रं. 269/ 2023 कलम 379 भादंवि. मधील 1) हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा. क्र. MH 35 N 4425 हस्तगत करून जप्त करण्यात आले आहे. पुढील कारवाई करण्या करिता आरोपीसह, जप्त मो.सा.आमगाव पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची कामगिरी पो. नि. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स. फौ. अर्जुन कावळे, पो. हवा. राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भूवनलाल देशमुख, विठ्ठल ठाकरे, कोडापे, पो. शि. हंसराज भांडारकर, चापोहवा लक्ष्मण बंजार यांनी केलेली आहे.