सावित्रीबाई फुले महिला फालोअर्स ग्रुप तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..
गोंदिया: मणिपुर येथे जातीय हिंसाचार घडवून दोन निष्पाप महिलांची नग्न धिंडी काढून त्यांच्यावर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना ही सम्राट अशोकाच्या भारतात अशोभनिय आहे. या अमानुष घटनेचे सावित्रीबाई फुले महिला फालोअर्स संघटन तिव्र निषेध व्यक्त करत आहे.
भारतीय राज्यघटनेच्या ४२ व्या घटना दुरुस्तीनुसार महिलांचा सम्मान करणे हे लोकांचे कर्तव्य असून मणीपुरची ही घटना असंविधानिक आहे.
कारगीलच्या युध्दात देशांचे संरणक्षण करणाऱ्या वीर जवानांच्या वीर पत्नीचा असा अपमान करणे जातीयवादी आणि संकिर्ण मानसिकतेच्या नराधमांनी केलेले घोर कृत्य आहे. तेव्हा या नराधमांवर कडक कार्यवाही करुन त्यांना फाशीची शिक्षण ठोठविण्यात यावी.
आमच्या निवेदनांवर लक्ष पुर्वक विचार करुन सदर जातीयवादी नराधमावर कडक कार्यवाही करण्याची मागणी सावित्रीबाई फुले महिला फालोअर्स ग्रुप तर्फे सोमवार २४ जुलै रोजी गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना महामहीम राष्ट्रपतीच्या नावे दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे.
या प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला फोलोअर्स ग्रुप च्या महीला सविता उके, सपना देशभ्रतार, तक्षशिला गडपायले, पंचशील पानतवने, सायली वाघमारे, गीता गजभिये, वंदना भाऊतमांगे, दर्शना वासनिक, किरण वैद्य, छाया मानकर, उत्तमा गोंडाणे, सोनम मेश्राम, स्मिता गणवीर, श्वेता मेश्राम, संध्या जनबंध, संगीता पुसाम, प्रमिला सिंद्रमे, अनिता मेश्राम, कोकिळा राहुळकर, विभा डोंगरे, आशा मेश्राम,अनुपमा पटले, स्मिता गणवीर, विशाखा वासनिक, समता गणवीर, निरंजना चीचखेडे, संध्या बनसोड, निकिता सांगोळे, शारदा ठवरे, नलिनी नंदेश्वर, धर्मशीला शेंडे, चंपा हुमणे, मालती किनके दीपिका घरडे, अनिता उके आदि महीला प्रामुख्याने उपस्थित होते.