460 Views
प्रतिनिधी / सालेकसा
महाराष्ट्र शासनाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. यासाठी विविध ठिकाणी जनजागृती करिता मोहीम सुद्धा राबवण्यात आली आहे. शाळा महाविद्यालयातर्फे प्रभात फेरी काढून हेल्मेट वापरण्याबाबतची संदेश सुद्धा नागरिकांना दिले आहेत. तरीही नागरिकांकडून हेल्मेट वापरणे टाळले जात असल्याने आता पोलीस विभागातर्फे पेट्रोलिंग करून हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाहीचे पवित्र घेतलेला आहे.
सालेकसा येथील मुख्य चौकात वाहतूक विभाग गोंदिया तसेच सालेकसा पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने पोलीस पेट्रोलिंग करून हेल्मेट सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, वाहतूक शाखेचे चांगदेव उईके, दिनेश गौतम, राधेश्याम रहांगडाले, राकेश लुचे, विजेंद्र चुलपार, मपोशी कल्पना रहांगडाले व इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.