प्रतिनिधी / सालेकसा
सालेकसा येथील तालुकास्तरीय क्रीडा संकुलाचे बांधकाम होऊन वर्ष लोटले तरीही उद्घाटन अभावीच संकुल सुरू करण्यात आले. त्यामुळे अद्याप क्रिया संकुलाला कोणतेही नाव देण्यात आले नाही. शिवाय राजकारणाच्या पेचात फसून अद्याप उद्घाटन न झाल्याने अजूनही तालुका क्रीडा अधिकाऱ्याची सुद्धा नेमणूक झालेले नसल्याने पद रिक्त आहे. स्पर्धा परीक्षा व शारीरिक चाचणीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
नगर विकास आघाडी सालेकसाच्या वतीने सदर क्रीडा संकुल आला ‘एकलव्य क्रीडा संकुल’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आलेली आहे.
सालेकसा तालुका आदिवासी बहूल असून आदिवासी संस्कृतीने व्यापलेला आहे. तालुक्यात आदिवासी संस्कृती आणि कलेचा वाव असून यामुळेच तालुक्याला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. त्यासाठी आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान असलेले एकलव्य यांच्या कार्याला प्रेरित होऊन तालुका क्रीडा संकुलाला एकलव्य क्रीडा संकुल असे नाव योग्य असणार असे निवेदनातून स्पष्ट केलेले आहे.
यासोबतच क्रीडा संकुलात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मानधन अनियमित असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून डीबीटी च्या माध्यमाने दरमहा मानधन अदा करण्यात यावे अशीही मागणीचे निवेदन प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी व तहसीलदार असलेले नरसय्या कोंडगुरले यांना देण्यात आले.
यावेळी नगर विकास आघाडीचे समन्वयक मनोज डोये, राहुल हटवार, रोहित बनोठे, विनोद वैद्य, गुणीलाल राऊत, कैलाश गजभिये, विनोद मडावी, गोल्डी भाटिया, यशवंत शेंडे, उमंग बनसोड, स्वप्निल करवाडे व अनेक विद्यार्थी उपस्थित होते.