मोहाडी येथे पंधरा लक्ष रूपये चे रस्ता खडीकरण बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…

414 Views

सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या पुढाकाराने विविध विकासकामांना सुरूवात..
——————————-
गोरेगाव – दिनांक २० जून रोजी तालुक्यातील मोहाडी ग्रांम पंचायत येथे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या पुढाकाराने विविध विकासकामे जोमात सुरू असुन त्यांतच आज महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्ता खडीकरण चोपा- मोहाडी मेन रोड ते जीवनलाल गौतम यांच्या शेतापर्यंत ७:५० लक्ष रूपये व जीवनलाल गौतम यांच्या शेतापासुनते भोलाराम कनोजे यांच्या शेतापर्यंत अंदाजित रक्कम ७:५० लक्ष रूपये बांधकामाचे भूमिपूजन सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर पांदन रस्ता वर रहिवासी नागरिक राहत असुन पावसाळ्यात नागरिकांना ये- जा करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करूण प्रवास करावा लागत होते या रस्त्याकरिता सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी पुढाकार घेऊन सदर खडीकरण रस्ता मंजुर करुन आणुन दिले.

या भुमिपुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपसरपंच श्रीराम पारधी होते यावेळी ग्रांम पंचायत उपसरपंच मोहनलाल पटले, माजी उपसरपंच सुरेश चौधरी, सामाजिक कार्यकर्ता कमलेश पटेल,आर एफ पारधी सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे जे पटले सर, सेवानिवृत्त शिक्षक वाय एफ पटले सर, सेवानिवृत्त सैनिक कुवरलाल चौधरी, कार्यरत सैनिक पटले, ग्रांम पंचायत सदस्य भिवराज शेंडे, योगराज भोयर, खेमराज वाकले,प्रभा पंधरे, चंन्द्रकांता पटले, पुस्तकला पटले,भुराजी भोयर कमलेश पारधी सामाजिक कार्यकर्ता प्रमानंद तिरेले तेजलाल कावडे, मदनलाल चौधरी, देवराज चौधरी, पालिकराम बोपचे, हिरामण पटले, रोजगार सेवक चेतेश्वरी पटले, शिवराम मोहनकार, चुळामन पटले,दुधब्रवे, दुर्गेश चेचाने,आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मोहाडी ग्रांम पंचायत चे सचिव पी बी टेंभरे यांनी केले।

Related posts