अनेक दिग्गज नेत्यांच्या केसीआर यांच्या ‘बीआरएस’ पक्षात प्रवेश, अबकी बार किसान सरकार चा नारा:- चरण वाघमारे

254 Views

 

तुषार कमल पशिने

तुमसर। तेलंगाना राज्याचे मुख्यमंत्री के. चन्द्रशेखर राव (केसीआर) यांची पार्टी भारत राष्ट्र समिति मध्ये नुकतेच तुमसर क्षेत्राचे माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे नेतृत्व व त्यांचे समर्थानात विश्वास ठेवून अनेक विविध पक्षाच्या दिग्गज नेत्याने बीआरएस पक्ष मधून प्रवेश केला।

पक्ष प्रवेश मधून डॉ.प्रकाश महालगावे राष्ट्रीय मच्छीमार आघाडी भाजप चे माजी अध्यक्ष, भंडारा जिल्हा भाजप चे माजी जिल्हाध्यक्ष, जनसंघपासून आतापर्यंत भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजप रुजविणारे कर्मठ कार्यकर्ता, धनंजय मोहोकर माजी जिल्हाध्यक्ष भाजप भंडारा जिल्हा, अरविंद भालाधरे भाजप चे भंडारा विधानसभेचे माजी उमेदवार, जिप भंडारा चे माजी सभापती, राजेश चांदेवार माजी जिप सदस्य गोंदिया, शिवसेना, दिलीप कुंभरे राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष देवरी, दीपक माटे देवरी, योगेश मेश्राम राष्ट्रवादी काँग्रेस देवरी, जगदीश बोहोरे काँग्रेस तालुका अध्यक्ष किसान आघाडी देवरी, भास्कर हटवार निलागोंदी, अरुण भेदे माजी नगरसेवक भाजप नप भंडारा यांनी आपल्या हजारो समर्थकासह भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करून, अबकी बार किसान सरकार चा नारा दिला

यावेळी महाराष्ट्रातील तसेच तेलंगणा चे BRS नेते उपस्थित होते.

Related posts