महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस: 1 मे ला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण..

159 Views

 

        गोंदिया,दि.28 : महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ दिनांक 1 मे 2023 रोजी साजरा करण्यात येत आहे. 1 मे रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी केले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो मास्कचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related posts