भंडारा: पवनी येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती अनावरण सोहळा थाटात संपन्न

522 Views

 

भंडारा। आज चंद्रमणी बौद्ध विहार समिती च्या वतीने चंद्रमणी बौद्ध विहाराच्या प्रांगणात, तहसील कार्यालयाजवळ पवनी जि.भंडारा येथे भगवान गौतम बुद्ध मूर्ती चे अनावरण सोहळा भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या शुभ हस्ते, खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेत व मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

सम्राट अशोक कालीन बौद्ध नगरी पवनी येथे पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तूपाच्या ऐतिहासिक ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती अनावरण सोहळ्याचा साक्षीदार होणे हे माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

अनावरण सोहळा प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री नितीन राऊत, जोगेंद्र कवाडे, धनंजय दलाल, राजूभाऊ कारेमोरे, मनोहर चंद्रिकापुरे, मधुकर कुकडे, मोहन पंचभाई, शैलेश मयूर, विकास राऊत, प्रकाश पचारे, मोहन सुरकर, महेंद्र गडकरी, मोरेश्वर गजभिये, असीत बागडे, डी एफ कोचे, बंडू मेश्राम, बंडू हटवार, जयपाल टेंभुर्णे, डॉ. देशकर, सरिता शेंडे, रूपचंद रामटेके, नामदेव मेश्राम, प्रशांत नारनवरे, सिद्धार्थ गायकवाड, धम्मज्योती गजभिये, विजय सावरबांधे, मुकेश बावनकर, हरीश तलमले, यादवराव भोगे, चेतक डोंगरे, छोटू बाळबुद्धे, तोमेश्वर पंचभाई, जितू नखाते, फिरोज मोहरकर, गोलू अलोणे, हेमंत मेनवाडे, गुड्डू रघुते सहित मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Related posts