गोंदिया येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित, खा.सुनिल मेंढे हिरवी झेंडी दाखविणार..

228 Views

 

गोंदिया जिल्ह्यात दि.12 ते 18 मार्च दरम्यान तालुका स्तरीय महिला आणि पुरुष मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खा.मेंढे यांनी खासदार क्रीडा महोत्सव सुरु केला आहे. 9 मार्च पासून भंडारा व गोंदिया लोकसभा क्षेत्रात खेळाच्या महाकुंभाला सुरुवात झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या जात आहेत.
उद्या 12 मार्च रोजी गोंदिया तालुक्यात महिला व पुरुष मॅरेथॉन दौड घेतली जाणार आहे. यामध्ये पुरुषांसाठी 6 किमी तर महिलांसाठी 3 किमीचे अंतर कापावे लागणार आहे. पुरुषांमध्ये प्रथम विजेत्यासाठी १५०००रु. , द्वितीय विजेत्यासाठी ७००० रु., तृतीय विजेत्यासाठी ५००० रु. महिलांसाठी प्रथम विजेत्यासाठी ११०००रु. , द्वितीय विजेत्यासाठी ७००० रु., तृतीय विजेत्यासाठी ५०००रु. बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारत, जयस्तंभ चौक येथून खा.सुनिल मेंढे यांच्या हस्ते स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे.
या मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related posts