गोंदिया: ऑनलाइन जुगार अड्ड्यावर रामनगर पोलिसांची धाड,चौघांना अटक…

790 Views

 

3 लाख 24 हजार 300 रुपयांचा मुद्दे माल जप्त..

 

गोंदिया। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर धाडी घालून प्रभावी कारवाई करण्याचे निर्देश देऊन आदेशित केले आहे, या आदेशान्वये उप-विभागीय पोलीस अधि कारी, उप-विभाग गोंदिया, श्री. सुनील ताजने, पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीसांनी, गोपनीय माहितीच्या आधारावरून पोलीस ठाणे रामनगर हद्दीतील ऑफिसर कॉलनी कुडवा येथील जुगार अड्ड्यावर धाड घातली असता एका बंद कमऱ्यात अवैधरित्या वाय-फाय रुटरव्दारे लॅप टॉप, मोबाईलचे माध्यमाने जन्नत बुक ॲपवर ऑनलाईन पैश्यांचा जुगाराचा खेळ खेळत असतांना चार युवकांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या चारही युवकांचे ताब्यातून एकूण नऊ मोबाईल किंमती 1,75,000/- रुपये, 3 एचपी कंपनीचे लॅपटॉप किंमती 1,44,500/- एक रावटर 2000/-,दोन नग एक्सटेंशन बॉक्स 800 /-, तसेच चार मोबाईल चार्जर 2000/- असा एकूण किंमती 3,24,300/- रुपयांच्या मुद्दे माल जप्त करण्यात आला.

ऑनलाईन जुगार खेळ प्रकरणी आरोपी नामे- 1) भुपेन्द्र श्यामराव बोरकर वय-24 वर्षे रा. दंतेश्वरी पारा वार्ड क्र.2 डोंगरगढ ता. डोंगरगढ जि.राजनांदगांव (छ.ग) 2) अभिनव अशोककुमार चंद्रकार वय 21 वर्ष रा. आझाद वार्ड क्र.1, गोल बाजार डोंगरगढ ता. डोंगरगढ जि. राजनांदगांव (छ.ग), 3) लोकेश जगदीश खोब्रागडे वय 31 वर्षे रा. वार्ड क्र.3 कुडवा गोंदिया 4) शुभम रविंद्र नंदेश्वर वय-22 वर्षे रा.एम.आय.टी. कॉलेजचे बाजुला वार्ड क्र.2 कुडवा गोंदिया. तसेच ऑनलाईन जुगाराचा खेळ खेळविणारा आरोपी क्र. 5) नितीश तेजराम डोंगरे वय-32 वर्षे रा. बोथली आमगांव जिल्हा- गोंदिया यांचेविरुद्ध कलम 4,5 महा.जुगार कायदा, सह कलम 109 भादवी प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सदरची धाड कारवाई वरिष्ठांचे आदेशान्वये पोलीस ठाणे रामनगर चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पोलीस अंमलदार पो.हवा. जावेद पठाण, राजेश भुरे, चा. अभय चव्हाण, पो. शि. कपिल नागपुरे, राहुल वणवे यांनी कामगीरी केलेली आहे.

Related posts