गोंदिया: बिरसी विमानतळ पुनर्वसितांचा विषय तत्काळ मार्गी लागणार, खासदार सुनील मेंढे यांनी घेतली महत्वपूर्ण बैठक

531 Views

 

गोंदिया। गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळा अंतर्गत असलेल्या लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न येत्या महिनाभरात मार्गी लागेल चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार सुनील मेंढे यांनी याच विषयाला घेऊन प्रमुख अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेत यासंदर्भात निर्देश दिले.

बीरसी विमानतळ परिसरातील 106 लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला होता. या विषयाला घेऊन गावकऱ्यांनी आंदोलनाची भूमिकाही घेतली होती. त्या दरम्यान या लोकांचे पुनर्वसन होणे क्रम प्राप्त असल्याने हा विषय तत्काळ मार्गी लागावा या दृष्टीने आज पुन्हा एकदा खासदार सुनील मेंढे यांनी विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी व अन्य प्रमुख अधिकाऱ्यांना घेऊन महत्त्वाची बैठक घेतली.

यावेळेस बैठकीत उपजिल्हाधिकारी मा.राजेश खवले, निवासी जिल्हाधिकारी मा.जयराम देशपांडे, मा.सुभाष चौधरी, जिल्हा भूमिअभिलेख अधिकारी मा.रोहिणी सागरे, तहसीलदार मा.धंनजय देशमुख, अप्पर तहसीलदार मा.अनिल खंडतकर, विमानपतन DAPD मा.गोस्वामी साहेब, उपविभागीय अधिकारी गोंदिया मा.पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी तिरोडा मा.पूजा गायकवाड, पोलीस निरीक्षक गोंदिया शहर मा.बन्सोड, पोलीस निरीक्षक मा.बोरसे, रावनवाडी पोलीस निरीक्षक मा.दर्भडे, रेल्वे अधिकारी मा.मुकेश सिंग, मा.गोस्वामी , मा.संजय कुलकर्णी जिल्हा महामंत्री, मा.गजेंद्र फुंडे जिल्हाध्यक्ष ओबीसी आघाडी , मा.गोल्डी गावंडे व बिरसी येथील उपसरपंच मा.हेमराज तावाडे, मा.सुरेंद्र तावाडे व गावातील नागरिक, पोलिस प्रशासन तसेच बांधकाम विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुनर्वसन करावयाच्या जागेची तात्काळ मोजणी करून त्याचे भूखंड पाडण्यात यावे आणि ती जागा त्या त्या प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी असे स्पष्ट निर्देश खासदारांनी दिले. विमानतळ व्यवस्थापन दोन दिवसात मोजणीसाठी द्यावयाचे पैसे संबंधित विभागाकडे जमा करून सोमवार भुमिअभिलेख कार्यालयाकडून तात्काळ मोजणी करून द्यावी असे खासदार यांनी सांगितले. या जागेची मोजणी करून प्रमाणपत्र दिल्यानंतर नगर रचनाकार विभागाच्यावतीने तात्काळ बांधकामाला परवानगी देण्याच्या सूचना खासदारांनी केल्या.

जवळपास पंधरा दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन आगामी एक महिन्याच्या कालावधी प्रत्यक्ष घरांच्या बांधकामाला सुरुवात होईल या दृष्टीने कामाची गती वाढावी व नियोजन करावे असेही खासदार यांनी सांगितले. पुनर्वसनाच्या दृष्टीने आजची ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.

Related posts