गोंदिया: शैक्षणिक दस्तावेज हरविल्यामुळे विद्यार्थी अडचणीत, बरबसपूरा येथील प्रकार

485 Views

 

गोंदिया(ता.27) शैक्षणिक कामासाठी सायकलने प्रवास करीत असताना बैगेत ठेवलेले संपूर्ण शैक्षणिक दस्तावेज हरविल्याची घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपुरा येथील एका विद्यार्थ्यासोबत घडली असून अनमोल साहेबलाल दमाहे असे या अभागी विद्यार्थ्याचे नाव आहे. सदर विद्यार्थ्याचे संपूर्ण दस्तावेज गहाळ झाल्यामुळे त्याच्यासमोर आता पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.

 

सदर विद्यार्थी सोमवारी (ता15) आपल्या घरून शैक्षणिक कामासाठी इटभट्टा ते तडका हॉटेल रोड मार्गे सायकलने जात असताना मागे ठेवलेली त्याची शैक्षणिक दस्तावेज असलेली बॅग मार्गात गहाळ झाली. त्यात त्याचे आधार, पैन, निवडणूक कार्ड, बँकेचे पासबुक, वर्ग दुसरी ते बारावी पर्यंत सर्व गुणपत्रिका,कृषी व आयटआय गुणपत्रिका व प्रमाणपत्र, कृषी लायसन्स, जाती व अधिनिवास प्रमाणपत्र गहाळ झालेले आहेत.

सदर घटनेची विद्यार्थ्याने गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार नोंदविली असून या घटनेला दहा दिवस उलटले तरी अद्यापही सदर विद्यार्थ्याच्या शैक्षणिक दस्तावेजांचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे या अभागी विद्यार्थ्यांसमोर पुढील शिक्षणाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. सदर शैक्षणिक दस्तावेज जर कुणाला ही मिळाले असतील तर त्यांनी कृपा करून परत करण्याची ही विनंती हि या अभागी विद्यार्थ्याने प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

Related posts