तिरोड़ा: राष्ट्रीय पोषण महिना जनजागृती अभियान – अदानी फाउंडेशन चा पुढाकार

314 Views

 

तिरोड़ा। अदानी फाउंडेशन तिरोडा द्वारा तालुक्यातील 48 गावांमध्ये राष्ट्रीय पोषण महिना जनजागृती अभियान अदानी पावर प्रमुख श्री कांती बिश्वास यांच्या मार्गदर्शनाखाली व अदानी फाउंडेशनचे हेड श्री नितीन शिराळकर यांच्या नेतृत्वात कोविड-19 च्या नियमांचे पालन करून राबविण्यात आले.
पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या बालकांमध्ये व माता मधील कुपोषण दूर करणे, विविध उपलब्ध आहारामध्ये असणाऱ्या पोषक घटकांविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे तसेच उपलब्ध कडधान्य, एकदल धान्य यापासून तयार करता येणार्‍या पाककृती विषयी गृहिणींना जागृत करणे या उद्देशाने अभियानाअंतर्गत महिला बैठक, किशोरी बैठक, परसबाग बियाणे वाटप, परसबाग प्रात्यक्षिक, आहार जागृती फेरी, पाक कृती प्रदर्शनी, पाक कला व फळबाग निर्मिती यासारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याअंतर्गत तालुक्यातील एकूण 1360 महिला व किशोरी यांनी सहभाग नोंदविला. अभियानाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी श्री स्वप्निल वाहणे तसेच सुपोषण कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर कार्य करणाऱ्या सर्व संगिनी आणि तालुक्यातील 83 अंगणवाडीच्या कार्यकर्त्या यांनी परिश्रम घेतले.

Related posts