कोरोना बाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी गोंदिया नगरपरिषदेकडून निशुल्क शववाहिका उपलब्ध

351 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया। दि 30। जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे बाधितांचे प्रमाणदेखील वाढत आहे.बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर उपचार देखील करण्यात येत आहे.

गोंदिया नगरपालिका क्षेत्रात दुर्दैवाने कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर गोंदिया नगर परिषदेकडून अंतिम संस्कार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करण्यात येत आहे.गोंदिया शहरात बाधित व्यक्तींचा शासकीय रुग्णालय, खाजगी रुग्णालय किंवा घरी मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने घेतली आहे.यासाठी दोन कर्मचारी पीपीई किट घालून तेथे पोहचतील. अंतिम संस्कारासाठी लागणारे लाकडे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी गोंदिया नगर परिषदेने घेतली असून यासाठी मृतकाच्या नातेवाईकांकडून कोणतीही फी आकारण्यात येणार नाही.

गोंदिया नगरपालिका क्षेत्रात कोविड -१९ विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींसाठी पांगोली स्मशानभूमी घाट निश्चित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशाने गोंदिया नगर परिषदेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शव वाहिकेच्या व्यवस्थेसाठी गोंदिया नगर परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता सुमित खापर्डे (7276369802),स्वास्थ निरीक्षक प्रफुल पानतावणे ( 9403126126) आणि आनंद नागपुरे(9307097088) यांचेशी संपर्क साधावा. असे आवाहन गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी केले आहे.

Related posts