गोंदिया: वादळात उडाले घराचे छत बरबसपूरा येथील घटना…

321 Views

 

गोंदिया ता.19 बुधवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळात घराचे छत उडाल्याचे घटना गोंदिया तालुक्यातील बरबसपूरा येथे घडली. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक वादळ आले. त्यात बरबसपूरा येथील शेतकरी भाऊलाल नागोराव पटले यांच्या राहत्या घराचे संपुर्ण छत उखडून रस्त्यावर आले. नेहमीच वर्दळ असलेल्या या रस्त्यावर त्यावेळेस कोणतीही वाहतूक नव्हती त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यात सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.या वादळामुळे गावातील सर्व विद्युत तारा शुद्धा तुटून पडल्या त्यामुळे गावात विद्युत पुरवठा बंद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तलाठी ठकरेले,सरपंच गीतावंती नागपुरे, उपसरपंच मनोज नागपुरे, सामाजिक कार्यकर्ते शिवलाल नेवारे, विनोद मेश्राम यांनी धाव घेऊन पंचनामा करीत रस्ता मोकळा करून दिला.

Related posts