तिरोड़ा नप क्षेत्रात माझे कुटुंब-माझी जवाबदारी मोहीमची पहिल्या टप्प्यात शुरुवात…नगराध्यक्ष सोनाली देशपांडेनी केली प्रथम चाचणी..

215 Views
प्रतिनिधि।
तिरोड़ा। करोना विषाणुचा प्रादुर्भाव व मृत्यु कमी होण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र शासनाचे आदेशान्वये व जिल्हाधिकारी गोंदिया यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने नगर परिषद तिरोडा क्षेत्रात माझे कुटुब माझी जबाबदारी ही मोहिम दोन टप्यात राबविण्यात येणार आहे.
   पहिला टप्पा 15 सप्टेबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान व दुसरा टप्पा 14 ते 24 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने नगर परिषद तिरोडा मध्ये माझे कुटुब माझी जबाबदारी ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदर मोहिमेची सुरवात शहरातील प्रथम नागरीक श्रीमती सोनाली अमृत देशपाडे नगराध्यक्ष नगरपरिषद तिरोडा यांच्या घरापासुन करण्यात आलेली आहे.तसेच श्री सुनिलभाउ पालांदुरकर उपाध्यक्ष नगरपरिषद
तिरोडा याचे ही सर्वेक्षण करण्यात आले आहे.
    सदर सर्वेक्षणासाठी नगरपरिषदेतर्फे 18 पथक तयार करण्यात आले असुन त्यात 65 शिक्षक कर्मचा-यांचा यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रत्येक घराची तपासणी करण्यात येणारे आहे. सदर पथकाच्या माध्यमातुन शहरातील सर्व नागरीकांना आव्हान करण्यात येते की समाजिक अंतर पाळावे, मास्कचा वापर करावा साबनाने वारंवार स्वच्छ पाण्याने हातधुवावे तसेच आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणा-या प्रगणकांना माहिती देण्यात यावी.
   आपन माझे कुटुब माझी जबाबदारी असे समजुन सर्वेक्षणाला सहकार्य करावे असे आव्हान श्रीमती सोनाली अमृत देशपांडे नगराध्यक्ष नगरपरिषद तिरोडा श्री सुनिलभाउ पालांदुरकर उपाध्यक्ष नगरपरिषद तिरोडा श्रीमती अर्चना मेढे मुख्याधिकारी नगर
परिषद तिरोडा व समस्त नगरसेवक नगर परिषद तिरोडा यांच्या माध्यमातुन करण्यात येत आहे.

Related posts