भंडारा: तोडलेला विद्युत पुरवठा पुर्ववत सुरू करा…आमदार डॉ. परिणय फुके यांचे विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता यांना निर्देश

739 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा (२६ मार्च) : भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे थकित असलेले वीज बिलापोटी महावितरण ने वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही सुरू केली असुन यामुळे अनेक गावात अंधार पसरला आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा देखील ठप्प झाला आहे. याबाबत आज आमदार डॉ परिणय फुके हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना शहापूर गावाजवळील कवडसी फाट्यावर विद्युत वितरण विभागावर रोष व्यक्त करीत ग्रामस्थ एकत्र आले होते. त्यांची कैफियत आ. फुके यांनी आस्थेने येकूण घेतली व लगेच विद्युत विभागाचे अधिक्षक अभियंता श्री नाईक यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पण तोडगा निघत नसल्याचे पाहून लगेच आ. फुके यांनी जिल्हाधिकारी श्री संदीपजी कदम, अधिक्षक अभियंता श्री राजेशजी नाईक व जी.प.चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सचिन जी पानझाडे यांच्याशी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित केली. एक वर्षापासुन कोरोना महामारीमुळे ग्रामस्थानकडे पैसा नसल्याने ग्रामपंचायतीकडून वसुली झाली नाही. विद्युत वितरण कंपनीचे बिल ग्रामपंचायतीना अदा करता येऊ शकले नाही अशी गाथा सरपंच यांनी मांडली.
यावर आ. फुके यांनी पाणी व स्ट्रीट लाईट हे दोन्ही नागरिकांच्या मूलभूत गरजा असून सध्या कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता विज खंडित करणे योग्य नसल्याने त्वरित विद्युत पुरवठा सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अधिक्षक अभियंता यांना दिले.
आमदार यांचा रोष बघता लगेच अधिक्षक अभियंता यांनी विद्युत विभागाला निर्देश देऊन विद्युत पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले. याबाबत ग्रामस्थांना विचारणा केली असता विद्युत पुरवठा सुरू झाल्याचे सांगत आ. फुके यांचे मनपुर्वक आभार मानले. त्यामुळे आज “जैसा बोले तैसा चाले” याचा प्रत्यक्षात अनुभव पहावयास मिळाल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले.

यावेळी विनोदजी बांते भाजपा तालुकाध्यक्ष,चंद्रप्रकाश दुरुगकर मा.जि. प.सदस्य, अमितजी वसानी प.स.सदस्य, बबलुजी आतीलकर, विनोदजी भुरे, संजय कुंभलकर, रुबीजी चढा, खैरी च्या सरपंचा प्रमिलाताई शहारे,पिपरी च्या सरपंचा मेश्राम ताई, ठाणा च्या सरपंचा पवारताई सालेबर्डी च्या सरपंचा बोरकर ताई व बऱ्याच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts