खा.प्रफुल पटेल ७ व ८ एप्रिल ला भंडारा – गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर

89 Views

 

गोंदिया। खासदार प्रफुल पटेल दोन दिवसीय दौऱ्यावर असून दिनांक ७ व ८ एप्रिल २०२६ ला भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

दिनांक ७ एप्रिल, २०२६ मंगळवारला सकाळी ११ वाजता चांदपूर देवस्थान येथे श्री हनुमानजी दर्शन, सकाळी ११.३० वाजता एम.टी.डी.सी. रिसॉर्ट चांदपूर येथे पक्ष पदाधिकारी बैठक, दुपारी ०२.०० वाजता सिंधी धर्मशाला, खैरलांजी रोड, तिरोडा येथे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक, सायंकाळी ०५.०० वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी व चर्चा निवास स्थान, रामनगर, गोंदिया येथे उपस्थित राहणार.

तसेच दिनांक ०८ एप्रिल बुधवारला दुपारी १२.०० वाजता, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान येथे जलाशय नौका विहार शुभारंभ कार्यक्रम, दुपारी २.०० वाजता साकोली येथे श्री सुनील फुंडे यांच्या निवास स्थानी कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या भेटी, दुपारी ०३.३० वाजता शासकीय विश्राम गृह, लाखनी येथे कार्यकर्ता बैठक, सायंकाळी ०५.३० वाजता शासकीय विश्राम गृह, भंडारा येथे कार्यकर्ता बैठकिला उपस्थित राहणार आहेत.

वरील कार्यक्रमांना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने वरील कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केले आहे.

Related posts