गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल संघटन निर्माण करण्याचा संकल्प – प्रदेशाध्यक्ष ऍड. वसंत मनकर

25 Views

 

गोंदिया। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल आघाडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भवन, रेलटोली कार्यालय येथे किसान सभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. वसंत मनकरजी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली.

खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना संघटित पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी “गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल” हा संकल्प करायचा आहे. उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलची संघटना उभारून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कांसाठी मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून जिल्ह्यातील समस्या माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या सहकार्याने सोडवायच्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधित समस्या, सिंचन, वीज, तसेच शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम किसान सेलच्या माध्यमातून केले जाणार आहे असे प्रतिपादन ऍड. वसंत मनकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारा पक्ष राहिला आहे. त्यामुळे किसान सेलच्या माध्यमातून गावपातळीवर संघटन मजबूत करून शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन “गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल” हा संकल्प यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गोंदिया जिल्हा किसान आघाडीची जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष यांचे नियुक्तीपत्र यावेळी देऊन पक्ष वाढीसाठी सर्वांना शुभेच्छा व अभिनंदन करण्यात आले.

यावेळी सर्वश्री विदर्भ समन्वयक जगदीश जुनघरी, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, डॉ गणेश डोंगरे, बबनराव तीकांडे, प्रभाकर दोनोडे, राजलक्ष्मी तुरकर, डॉ योगेंद्र भगत, कुंदन कटारे, बाळकृष्ण पटले, पूजा अखिलेश सेठ, केतन तुरकर, गोपाल चावके, कमलबापू बहेकार, रवी पटले, विजय रहांगडाले, महेंद्र चौधरी, सेविकेम डोये, रामभाऊ हरिणखेडे, धनलाल जैतवार, धनराज तावाडे, चुन्नीलाल शहारे, सत्यवान देशमुख, धर्मराज पटले, धरमलाल रहांगडाले, भरत नागपुरे, जगदीश मराठे, नितीन टेम्भरे, दिलीप डोंगरे, राधेलाल बिसेन, महेश पटले, मोरेश्वर ठाकरे, सुनील पटले, शैलेश वासनिक, अलकेश मिश्रा, किशोर पारधी, मनोहर राऊत, संजय किंदरले, वामन गेडाम, राजेश कावळे, सुभाष कापगते, मुनेश्वर कापगते, अस्थिक परशुरामकर, दीपक कटरे, रघुदास नागपुरे, बाजीराव तरोणे, बृजभूषण बैस, हिरालाल साठवणे, गोविंद लिचडे, प्रल्हाद वंजारी, शिवलाल नेवारे, तुकडूदास रहांगडाले, बाबुराव ब्राह्मणकर, राजेश तुरकर, चौकलाल येडे, राजेश वाघाडे, सलमान शेख सहित मोठ्या संख्येने किसान सेलचे पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts