GONDIA: गुरूच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत पोहचता येते : मुख्यमंत्री फडणवीस

18 Views

 

CM फडणवीस यांची हनुमंतकथा कार्यक्रमात हजेरी

गोंदिया। कलयुगात ईश्वारापर्यंत पोहचण्यासाठी गुरू हे महत्वाचे माध्यम आहे आणि हे सौभाग्य आज गोंदिया येथून गुरू पिठाधिश्वर ऋितेश्वर महाराज यांच्या दर्शनाने तसेच त्यांच्या अमृतवाणीतून हनुमंत कथेच्या श्रवणाने प्राप्त झाले आहे. यासाठी मी या कार्यक्रमाचे यजमान खासदार प्रफुल पटेल व त्यांच्या धर्मपत्नी सौ. वर्षाताई पटेल यांचे आभार मानतो, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २२ डिसेंबर रोजी हनुमंत कथा पाठ कार्यक्रमात व्यक्त केले.

गोंदिया येथील धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात हनुमंत कथा पाठचे आयोजन करण्यात आले आहे. आज कथेचा दुसरा दिवस होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कथा श्रवणाच्या अनुषंगाने गोंदियात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरू ऋतेश्वर महाराज यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्राच्या भूमिवर आपण हिंदू धर्मियांना योग्य संदेश देत आहात, असे बोलत कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे, आमदार विनोद अग्रवाल, आ. डॉ.परिणय फुके, मा.आ. राजेंद्र जैन, आ. राजु कारेमोरे, आ. संजय पुराम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. महाराजांच्या आशिर्वाद व दीप प्रज्वलनानंतर कथेला प्रारंभ झाले. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या हनुमंत कथा कार्यक्रमात हजारोच्या संख्येत धर्मप्रेमी सहभागी होत आहेत.


………………………………………….

मानवाने आपले महत्व जपूण ठेवावे : पिठाधिश्वर ऋतेश्वरजी महाराज

भगवत कथा, हनुमंत कथाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती होते. परंतु कथा श्रवणपुरतेच बंधु-भगिनी धार्मिकतेचा परिचय देतात. मात्र त्यानंतर कसलाही परिवर्तन घडून येत असल्याचे दिसून येत नाही. मनात परिवर्तन करू शकत नाही तर कथा ऐकण्याची गरज काय ? असा सवाल उपस्थित होत असतो. मनुष्य होऊन कोणत्याही घडामोडीवर तुर्त प्रतिक्रिया व्यक्त करीत असेल तर मानव आणि प्राण्यांमध्ये फरक काय राहणार ? याचे चिंतन करायला पाहिजे. म्हणून मानवाने किंबहुना मनुष्याने आपले महत्व जपूण ठेवावे, असा संदेश पिठेश्वराधीश ऋतेश्वर महाराज यांनी दिला.

हनुमंत कथेच्या आज दुसर्‍या दिवसी भगवान हनुमंताच्या लीलेवर चर्चा करतांना महाराज बोलत होते. महाराज पुढे म्हणाले, आजकाल व्हॉटअ‍ॅप युनिव्हरसिटीच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करणार्‍या नव्या पिढीला शेअर व फारवर्डचा रोग लागला आहे. या रोगातून मुक्त होऊन वेध शास्त्राचा अध्ययन करायला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला. मानवाने आदर करायला शिकायला पाहिजे. धर्म व अध्यात्मिक्ता भय निर्माण करीत नाही. उलट भयमुक्त जीवन जगण्याचे शिकवन देत असते. तंत्र-मंत्राला बदनाम करू नका, असाही सल्ला त्यांनी दिला. कथा कार्यक्रमात हजारोच्या संख्येत धर्मप्रेमी उपस्थित होते. उद्या कथेच्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कथेचा लाभ घेण्यासाठी धर्मप्रेमींचा ओघ वाढणार, असा अंदाज आयोजकांकडून वर्तविला जात आहे.

Related posts