अधिवेशनात वसतीगृहांच्या सुरळीत संचालनासाठी आमदार बडोले यांनी विधानसभेचे वेधले लक्ष..

43 Views

 

नागपुर। महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (२०२५) अर्जुनी-मोरगावचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या वसतीगृहांच्या समस्या सदनाच्या निदर्शनास आणून दिल्या. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी लक्ष वेधून विनंती केली की, गेल्या ३-४ वर्षांपासून वॉर्डनना निधीअभावी वसतीगृह चालवण्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना होणाऱ्या हालांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. आमदार बडोले यांनी सांगितले की, वसतीगृहे सुरळीत चालण्यासाठी वेळेवर निधी उपलब्ध होणे गरजेचे आहे, जेणेकरून दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला खीळ बसू नये. त्यांच्या या मागणी वर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.

दुर्बल घटकांच्या होणाऱ्या जमीन अतिक्रमणाला चाप बसवा; आमदार बडोले यांची हिवाळी अधिवेशनात मागणी

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात (२०२५) आमदार राजकुमार बडोले यांनी राज्यातील ग्रामीण भागात होणाऱ्या जमीन अतिक्रमणाच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, गावातील काही धनाढ्य व्यक्ती कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती, पारधी समाज आणि भटक्या-विमुक्त जमातींच्या कुटुंबांकडे अल्प जमीन असते, अशा वेळी अतिक्रमणाच्या प्रयत्नांविरोधात ते सरकारी कार्यालय किंवा पोलिसांकडे धाव घेतात, मात्र दबावामुळे प्रकरण मार्गी लागत नाही. आमदार बडोले यांनी शासनाकडे या मुद्द्याचा गांभीर्याने विचार करून दुर्बल घटकांचे संरक्षण करण्याची विनंती केली.

Related posts