शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय – खासदार प्रफुल पटेल

108 Views

 

पवनी/भंडारा। राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. आम्ही नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी उच्छुक व्यक्तींनी सभासद नोंदणी करून पक्ष संघटन मजबूत करा.जनतेपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या समजून घ्या. आगामी पवनी शहर नगरपरिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व ताकतीने लढेल. जनतेने नगरपरिषदेची सत्ता हातात दिल्यास विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या पवनी शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता व शहरातील विविध समस्याना प्राधान्याने सोडविणासाठी पूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार श्री प्रफुल पटेल यांनी दिली.

आज टायगर डेन रिसॉर्ट, पवनी जि. भंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ताची महत्त्वपूर्ण बैठक खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल यांनी शहरातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

सभेला सर्वश्री नाना पंचबुद्धे, धनंजय दलाल, विजुभाऊ सावरबांधे, लोमेश वैद्य, हरीश तलमले, शैलेश मयूर, चेतक डोंगरे, मुकेश बावनकर, सुनंदा मुंडले, मनोरथा जांभुळे, हंशाताई खोब्रागडे, डॉ विजय ठक्कर, छोटूभाऊ बाळबुधे, जितू नखाते, हेमंत मेनवाडे, चरण पलवार, शेखर पडोळे, जयशीला भुरे, सौ.पुष्पाताई भुरे, शोभना गौरशेट्टीवार, सोनू रंगारी, ललित खोब्रागडे, बालूभाऊ चुन्ने, राकेश राऊत, महादेव शिवरकर, हरी काटेखाये, भूषण तुळसकर, संविधान नवनांगे, लंकेश मुंडले, खंदाडे ताई, अरविंद नखाते, सोमेश्वर भुरे, अनुराग वाघमारे, रोशन नागपुरे, सक्षम राऊत, मुन्ना गजभिये, विवेक रघुते, शालिनीताई मयूर, टोनीजी मयूर, सौरभ हबीब, गोपाल करिहार, बशीरभाई पठाण, प्रमोद डोये, सुधाकर मानापुरे, मोरेश्वर लांजेवार, नीलकठ टेकाम, दिवेश बारसागडे, अरविंद काकडे, सलीम खान, तेजराम मुंडले, मारोती तेलमसारे, सैय्यद परवेज सहित मोठ्या संख्येने पदाधिकरी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts