पत्रकारिता समाजाच्या मनाला दिशा देणारे प्रभावी माध्यम – आ. फुके

245 Views

प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चा १० वा स्थापना दिवस व सत्कार सोहळा

गोंदिया: पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याची प्रक्रिया नाही, तर समाजाच्या मनाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. पत्रकार हा समाजाचा प्रहरी, मार्गदर्शक आणि दीपस्तंभ असून लोकशाहीची पायाभरणी अधिक भक्कम करण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. विशेषतः आज डिजिटल युगात बातम्या देणारे अनेक माध्यम असले तरी वर्तमानपत्र आजही सर्वात विश्वसनीय माध्यम असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. परिणय फुके यांनी केले. ते सोमवार, १ सप्टेंबर रोजी हॉटेल जिंजर येथे आयोजित प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चा दहावा स्थापना दिवस व सत्कार समारंभात उद्घाटक म्हणून बोलत होते.

प्रेस ट्रस्ट चे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात प्रामुख्याने आमदार विनोद अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, सचिव संतोष शर्मा उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. फुके म्हणाले की, प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया ही संस्था दशकभरापासून एक सकारात्मक हेतूने पत्रकारांच्या कल्याणासाठी कार्यरत असून समाजासाठी आपले काही देणे आहे या उदात्त हेतूने समाजातील तळागाळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शोधून त्यांना सन्मानित करते व प्रोत्साहित करते. हे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया च्या भविष्यकालीन उद्देशाला पूर्ण करण्यासाठी शासन प्रशासनाची जे काही सहकार्य लागणार आहेत. याकरिता मी नेहमी सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आ. विनोद अग्रवाल यांनी आपल्या संबोधनातून प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया दरवर्षी समाजातील ज्या हिऱ्यांचे सत्कार व गुणगौरव करतो ते अनेकाना प्रेरणा देते. शहरासह जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण कार्य करत असून सर्वांच्या सहकार्यानेच त्या पूर्ण होऊ शकतात. पत्रकारिता ही अत्यंत जबाबदारीचे कार्य असल्याचे ते म्हणाले. जि प अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील अती दुर्गम भागात ईमानदारी व निष्ठेने अविरत कर्तव्यावर असलेल्या, सेवा देणाऱ्या लोकांचे, कामाचे, राजकीय असो की सामाजिक बाबी समोर आणणारा, त्यांची दखल घेणारा, त्यांची आवाज बनणारी पत्रकारांची लेखणी आहे म्हणूनच समाज निश्चिंत असल्याचे ते बोलले. या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या कार्याचे कौतुक करून सत्कारमूर्तीचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात अपूर्व मेठी यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया ज्या उद्देशाला घेऊन चाललेला आहे. त्यात सर्वांच्या सहकार्याने वाटचाल सुरू असून भविष्यकालीन योजना पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाची साथ हवी असल्याचे म्हणाले. प्रास्तविक संतोष शर्मा यांनी केले.


यावेळी सत्कार समारंभात 2025 करिताचे विविध क्षेत्रातील सत्कारमूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ, प्रमाणपत्र, मोमेंटो व सन्मान राशी देऊन सत्कार करण्यात आले. यात
कालूराम अग्रवाल यांना स्व. रंजीतभाई जसानी जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार, निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहरे यांना स्व. रामकिशोर कटकवार जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, शिवकुमार शर्मा यांना स्व. रामदेव जैसवाल जिल्हा गौरव साहित्यरत्न पुरस्कार, तुकाराम बोहरे यांना स्व. मोहनलाल चांडक जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्कार, मंगेश बोरकर यांना सहयोग सहकारी संस्था जिल्हा गौरव शिक्षक पुरस्कार, जीवनलाल राजवानी यांना स्व. दीपमभाई पटेल जिल्हा संगीतरत्न पुरस्कार, डॉ. निर्मला जयपूरिया यांना स्व. प्रा. योगेश नासरे जिल्हा विशेष पुरस्कार, तर सामाजिक संस्था श्रेणीत “एक पहल ऐसी भी” या संस्थेला गौरविण्यात आले सदर पुरस्कार राकेश वालेचा. तसेच यावर्षीचे जीवन गौरव पुरस्कार वरिष्ठ पत्रकार व भवानी टाइम्स चे संपादक चंद्रकांत खंडेलवाल यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
संचालन प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चे उपाध्यक्ष जयंत शुक्ला यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष रवी आर्य यांनी मानले.

कार्यक्रमाला प्रामुख्याने मुकेश शिवहरे, डॉ माधुरी नासरे, डॉ. गजानन डोंगरवार, नीरज कटकवार अमर वराडे, अभय सावंत, डॉ. दिलीप संघी, छैलबिहारी अग्रवाल, सविता बेदरकर, भावना कदम, दीपक कदम, डॉ. विकास जैन, डॉ लता जैन, लखनसिंह कटरे, रोशन जयस्वाल, जयदीप जसानी, दिलीप जैन, के के गजभिए, मुन्नालाल यादव, सावन बहेकार, निलेश कोठारी, अजय शामका, अतुल गजभिये, सुधीर कायरकर, मंजू कटरे, गुड्डू चांदवानी, खेमेंद्र कटरे, सुषमा यदुवंशी, संजय जैन, श्यामचंद्र येरपुडे, चंद्रेश माधवानी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हिदायत शेख, अंकुश गुंडावार, हरेंद्र मेठी, आशीष वर्मा, जाहिद (जावेद खान), कपिल केकत, रवींद्र तुरकर, संजीव बापट, योगेश राऊत, बिड़ला गणवीर, प्रमोद नागनाथे, मनोज ताजने, मुकेश शर्मा, राजन चौबे, नरेश राहिले, भरत घासले, राहुल जोशी, अर्चना गिरी यांनी परिश्रम घेतले.

Related posts