गोंदिया। गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या तलावांचे लिलाव संदर्भात आज १३ ऑगस्ट २०२५ रोजी पंचायत समिती च्या सभागृहात लिलाव संदर्भात वाटाघाटी सभा घेवून तलावांचे लिलाव करण्यात आले.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गोंदिया यांचे पत्र क्र. I/५३१३७३/२०२५ दिनांक ११/०८/२०२५ अन्वये आज दिनांक १३/०८/२०२५ रोजी बुधवारला सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद गोंदिया मालकीचे तलाव लिलाव व वाटाघाटी सभा आयोजित करण्यात आली. सदर तलाव वाटाघाटी/ लिलाव सभेत पंचायत समिती सभापती श्री मुनेशजी रहांगडाले, गटविकास अधिकारी आनंदराव पिंगळे, सहायक गटविकास अधिकारी श्री. महेंद्र के. मळामे, पंचायत समिती सदस्य अजाबराव रिणायत, विस्तार अधिकारी विनोद जाधव व सर्व मत्स्यपालन सहकारी संस्थांचे अध्यक्ष / सचिव/सदस्य /प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेचे नियोजित वेळी सभेत मा. श्री मुनेशजी रहांगडाले, सभापती पंचायत समिती गोंदिया, यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती गोंदिया अंतर्गत सन 2025-26 या कालावधीचे मत्स्यपालन करिता तलाव वाटाघटी करण्याची कार्यवाहीला सुरुवात करून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.