गोंदिया:(10 ऑगस्ट), आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलची बैठक पार पडली. या बैठकीला अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष व आमदार इद्रीस नायकवडी व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीत अल्पसंख्याक समाजासमोरील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण सशक्तीकरणासाठी व पक्षाशी त्यांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आगामी काळातील धोरणात्मक पावले उचलण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करीत आहे असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष व आमदार इद्रीस नायकवडी यांनी केले.
यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ घोषणाबाजी न करता अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीसाठी ठोस कृती करत असून पक्ष नेहमीच समाजहितासाठी बांधील असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी सालेकसा शहर अध्यक्ष म्हणून अहमदखान गुलाबखान पठाण व नासीर अली अमीर अली सय्यद यांची सालेकसा तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून इंजमामभाई तेले, रफिकभाई पठाण यांनी प्रवेश केला.
सर्वश्री इद्रीस नायकवाड़ी, राजेन्द्र जैन, प्रेम राहंगडाले, देवेंद्रनाथ चौबे, अशोक सहारे, केतन तुरकर, नानू मुदलियार, सी के बिसेन, अविनाश काशिवार, जगदीश बावनथड़े, केवल बघेले, खालिद पठान, राजु एन जैन, रवि पटले, समीर अहमद, जावेद खान, मोहसिन शेख, सैयद इरफान, सैयद हैदर अली, नासिर शेख, शेख सुभान, शकील भाटी, मकसूद मोहम्मद अली, मतीन पठान, साहिल शेख, समीर शेख, जमाल शेख, कलाम खान, मुकेश भलाधारे, नागों बंसोड, लवली होरा, प्रवीण बैस, अशोक जैन, अनुज जैस्वाल, लखन बहेलिया, लव माटे, जुनेद शेख उद्दीनखान , रवि हत्तिमारे, रशीद शेख, वासुदेव मेश्राम, मोहम्मद गुलाम, नीरज मसीहा, निहाल बागडे, बसंत डहाके, बाजीराव तरोने, बृजभूषण बैस, सैयद नासिर अली, सुरेश कुमरे, बबलू मानकर, नौशाद शेख, राजेश तैवाड़े, खुशाल कटरे, मुनिन शेख, अहमद पठान, हीरालाल साठवने, इमरान कुरेशी, सलीम अली, मनीष धमगाये, शमीम सिद्दीकी, अजान सिद्दीकी, अल्ताफ सिद्दीकी, रफीक पठान, जाकिर हुसैन तिगाला, मुन्ना खान, आरिफ पठान, मुन्ना बिंजाड़े, अमन घोड़िचोर, संदेश चोरे, प्रमोद ऊके, महेन्द्र शेंडे, प्रशांत वासनिक मोनू शेख गुलाम यासीन खन जाहिद खन मोहसिन अहमद यू कनऊ शेख शाहरुख पठान, सौरभ जयसवाल, नफीस सिद्धिकी, नसरीन पाशा, मोनिका सोंनवाने, चित्रा वैद्य, करिश्मा वैद्य, जुलेखा शेख, वर्षा बैस, नाफीसा कुरेशी, सोनम सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.