तिरोड़ा: आज तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार श्री. राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना माजी आमदार श्री. राजेंद्र जैन म्हणाले की, खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व आपल्या सर्वांच्या पाठीशी असून या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, अडी-अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने काम केले जाईल. तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य श्री जगदीश बावनथडे यांच्या सहयोगाने हे कार्यालय तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे व गती देणारे एक प्रभावी माध्यम ठरेल, आगामी काळात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या वतीने बळ देण्याचे काम केले जाईल तसेच स्थानिक प्रश्न, सोडवण्यासाठी हे कार्यालय एक दृढ दुवा ठरेल.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, जगदीश बावनथडे, अविनाश जायसवाल, अजयसिंग गौर, सलीम जवेरी, नरेश कुंभारे, मनोज डोंगरे, राजेश गुनेरिया, सुनिता मडावी, अनिल पारधी, नीताताई रहांगडाले, जगदीश कटरे, उषाताई चिंदरले, ममता बैस, जितेंद्र चौधरी, संदीप मेश्राम, विजय बिंझाडे, भोजराज धामेचा, रीताताई पटले, नागेश तरारे, मनोहर तरारे, विजय बनसोड, प्रभू असाटी, जयाताई धावडे, प्रशांत डहाटे, अनिल भगत, ओमप्रकाश येरपुडे, मनीषाताई पटले, सोनालीताई श्रीरामे, ममता हट्टेवार, दुर्गाप्रसाद कोठे, रामसागर धावडे, रस्मिताई बुराडे, शरद अग्रवाल, राहुल गहेरवार, शामराव उईके, अतुल भांडारकर, दुर्गेश कळपती, नागेंद्रसिंह ठाकुर, राजकुमार ठाकरे, जगनलाल धुर्वे, राजेश तायवाडे, भोजराज उईके, देवेंद्र चौधरी, विजय बुराडे सहीत मोठ्या संख्येने तालुक्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.