गोंदिया: जिल्ह्यात पावसाळ्यात सिमेंट रस्त्याचे व सिमेंट नालींचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे : तायवाडे 

194 Views
वार्ताहार। 30 जुलै
गोंदिया। जिल्ह्यातील अनेक विभागांमार्फत जसे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र १, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिति, MREGS विभाग व इतर विभागांमार्फत पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे बांधकाम करण्यात येत असतात. पावसाळ्यात सदर कामांना तात्काळ थांबविण्यात यावे असी मागणी पत्रकार राजेशकुमार तायवाडे व अशासकीय सदस्य विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिति विभाग नागपुर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांना निवेदन देऊन केलेली आहे.
राजेशकुमार तायवाड़े यांनी निवेदना द्वारे सांगितले कि, पावसाळ्यात सिमेंट कामांसाठी आवश्यक असलेले तापमान व आर्द्रता योग्य नसल्याने सिमेंट रस्त्यांचे व सिमेंट नालींचे काम पावसाळ्यात करने योग्य नसते, ज्यामुळे सिमेंट योग्य प्रकारे सेट होत नाही व कामांची गुणवत्ता घटते. पावसाळ्यात तापमान कमी जास्त होते व सिमेंटला योग्य प्रकारे सेट होण्यासाठी एक निश्चित तापमान आवश्यक असते, तापमान कमी झाल्यास सिमेंट योग्य प्रकारे कडक होत नाही व कामांची मजबुती कमी होते. पावसाळ्यात हवेत खुप जास्त आर्द्रता असते, सिमेंट मध्ये पाणी मिसळल्यानंतर, ते सेट होण्यासाठी काही प्रमाणात आर्द्रता आवश्यक असते, परंतु जास्त आर्द्रता सिमेंट मधील रासायनिक प्रक्रियेस अडथळा आणते, सिमेंट योग्य प्रकारे सेट नाही झाल्यास रस्त्याला व नाल्यांना तडे जाऊ शकतात किंवा त्यांची मजबुती कमी होऊ शकते, त्यामुळे पावसाळ्यात सिमेंट रस्त्यांची व सिमेंट नालींचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे. व पावसाळ्यात केलेले सदर बांधकामाचे देयके व मोजमापन पुस्तिका ( MB ) थांबविण्यात असी मांगनी केलेली आहे.
याच बरोबर, जर पावसाळ्यात केलेल्या कामांचे देयके देण्यात आले तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर व अभियंत्यावर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरुण शासकीय निधि दुरूपयोग होणार नाहीत असी मागणी सुद्धा यावेळी केलेली आहे.
सदर निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष साहेब, विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिति, विभाग नागपुर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समिति जिल्हा गोंदिया , मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद गोंदिया, अध्यक्ष  जिल्हा परिषद गोंदिया, बांधकाम सभापति जिल्हा परिषद गोंदिया, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद गोंदिया व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ यांना दिले आहे.

Related posts