हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी..

84 Views

 

गोंदिया। आज जाणता राजा, आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची पावन जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सूर्याटोला (गोंदिया) स्थित छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व त्यांच्या चरणी मानाचा मुजरा करून माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी अभिवादन केले.

याप्रसंगी माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी सर्वांना शिव जयंतीच्या शुभेच्छा दिल्या व आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आदर्शावर चालणे हेच आमचे ध्येय असले पाहिजे असे संबोधित केले. यावेळी आर्चिड इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थिनींनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वीरतेवर शौर्य गाथा सादर केली.

यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, नानू मुदलियार, केतन तुरकर, विनीत सहारे, सुनील पटले, शैलेश वासनिक, अनुज जैस्वाल, राजेश दवे, नागों बंसोड़, करण टेकाम, पंकज चौधरी, लिकेश चिखलोंडे, प्रशांत सोनपुरे, लव माटे, शोहनलाल गौतम, हर्षवर्धन मेश्राम, श्रेयस खोब्रागडे, श्रीमती सरिता ब्रह्मे, श्रीमती उमा सिंग, श्रीमती पुष्पा मेश्राम, श्रीमती विजया उके, श्रीमती योगिता डोंगरे, संदीप बोरकर, धनलाल राहंगडाले, बहादुर कटरे, किसन वाडवे, दामोदर रहांगडाले, अरुण तुपकर, आकाश वाडवे, भूषण पाटिल, टीनू खंडारे, भजन सुखदेवे, यश खोब्रागडे, सार्थक बोरकर, अमन घोडीचोर, तुषार उके, कपिल बावनथड़े, कुणाल बावनथड़े, हर्षवर्धन मेश्राम, रमाकांत मेश्राम, रौनक ठाकूर, दिलीप डोंगरे, प्रकाश बर्रैया, मंगेश रंगारी, शरभ मिश्रा, वामन गेडाम सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related posts