महायुती उमेदवार विनोद अग्रवाल यांना ऐतिहासिक विजय मिळवून देणार – राजेंद्र जैन

137 Views
प्रतिनिधि। 23 आक्टो.
गोंदिया। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. दरम्यान भंडारा गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका व वरिष्ठांकडून कार्यकर्त्यांसोबत समन्वय साधण्याचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. महायुती सोबत असलेल्या गठबंधनात महायुतीतील ज्या पक्षाला उमेदवारी दिली असेल त्या उमेदवारांशी एकनिष्ठ राहून आपल्याला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने खासदार  प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार आज गोंदिया येथे स्वागत लॉन, गोंदिया येथे गोंदिया विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व घटक/ सेल तसेच गोंदिया शहर व ग्रामीण समन्वयकांची बैठक माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. आज झालेल्या बैठकीतील कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह व सक्रियता गोंदिया विधानसभा क्षेत्रात विजयाची नांदीच ठरेल.
माजी आमदार राजेंद्र जैन कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले, खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्या पाठीशी पूर्ण शक्तिनिशी उभे राहील व उमेदवार निवडून आणू  यात कोणतीही शंका नाही.
महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या सर्वांगीण विकासाकरिता व सक्षमीकरणाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही. याची खात्री सरकारने दिली आहे. वर्षाला तीन गॅस सिलेंडर योजना,  गोरगरिबांच्या मुलींना उच्च व्यावसायिक मोफत शिक्षण देण्याची योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे खा प्रफुल पटेल यांच्या प्रयत्नाने सिंचनाचे प्रकल्प, मेडिकल, रेल्वे असे अनेक कामे झाली आहेत.
यावर्षी सुध्दा धानाला 25 हजार रुपये बोनस देण्याबाबत चर्चा झाली आहे. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत विज, शेतकऱ्यांना आता दिवसा विज मिळणार आहे. जनतेची दिशाभूल होवु देऊ नका, काम करणाऱ्या माणसाची ओळखं ठेवा. त्याकरिता महायुतीच्या पाठीशी ऊभे राहून निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.
महायुतीचे उमेदवार आमदार विनोद अग्रवाल यांनीही बैठकीला संबोधित केले. खा. प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार महायुती मधील सर्व घटक मित्र पक्षाच्या मध्ये समन्वय करण्याचें काम करू. महायुती सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांच्या आधारावर जास्तीत जास्त संख्येने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्ता तसेच सर्व आघाड्या/ सेल व गोंदिया ग्रामीण व शहरातील समन्वयक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Related posts