ग्रा.पं. सौंदड़ येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमात अडथला टाकण्याचे भाष्य करणारे कांग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल करा- सरपंच हर्ष मोदी

303 Views

 

वार्ताहर। 04 ऑगस्ट
सड़क अर्जुनी। ग्राम पंचायत सौंदड ता. सड़क अर्जुनी जि. गोंदिया येथे दिनांक ०३-०८-२०२४ रोजी बस स्थानक चौकात झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मोर्चात भाषण दरम्यान त्यांच्या मागण्या मांडण्यात आले होते. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार दिलीप बंसोड यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास १५ आँगस्ट रोजी ग्राम पंचायत सौदड कार्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम होवू देणार नाही असे भाष्य केले.

त्यांच्या मागण्या हे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन संबंधी असून त्याचे ग्राम पंचायत सौदड सोबत काहीही संबंध नाही. राष्ट्रीय महामार्ग संबंधी सर्विस रस्ता आणि पुलाच्या बांधकाम बाबत याआधी ग्राम पंचायतच्या वतीने मागणी अर्ज सूद्धा सदर केले गेले आहे. करिता स्वातंत्र्य दिनानिमित्त होणा्या ध्वजारोहण कार्यक्रमात कोणतेही विध्न येवू नये यासाठी सदर कार्यक्रमानिमित्त पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे व कांग्रेस जिलाध्यक्ष दिलीप बंसोड यांच्या वक्तव्य वरून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असी माँगणी सौंदड़ सरपंच आणि भाजप युवा मोर्चा चे जिला महामंत्री हर्ष विनोदकुमार मोदी यांनी देशाच्या गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, माजी मंत्री डॉ.परिणय फुके, राजकुमार बडोले, माजी खासदार सुनील मेंढे, जिलाधिकारी गोंदिया, पुलिस अधीक्षक गोंदिया यांनी केली आहे।

Related posts