मोहाडीत खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा संपन्न

110 Views

 

तुमसर। आज परमात्मा एक सभागृह, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलतांना श्री पटेल म्हणाले मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई करण्यासंबंधीचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते तेजस्विनी लोक संचालित साधन केंद्र च्या वतीने मोहाडी तालुक्यातील महीला बचत गटांना चटई वाटप कार्यक्रम व अहिल्याबाई महिला बचत गट आंधळगाव १७.५० लाख रुपयाचे व परमात्मा एक महिला बचत गट कन्हाळगाव यांना ७.५० लाख रुपयाचे महिलांच्या उन्नती करिता केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल कर्ज वाटप चेक वितरण करण्यात आले.

खा.श्री पटेल मेळाव्याला संबोधतांना म्हणाले की, देशात व राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी महायुतीच्या सरकारने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. सर्व सामान्य जनतेच्या कल्याणाकरीता आयुष्यमान भारत, केंद्र व राज्य सरकारच्या वतीने किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल, युवकांच्या स्वयं रोजगारासाठी मुद्रा लोन व युवा कार्य प्रशिक्षण योजना, जेष्ठ नागरीकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थ दर्शन योजना, महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी लाडकी बहीण योजना यासारखे योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन बदलण्याचे काम सरकारने केले आहे.

खा.श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, सुनिल फुंडे, धनंजय दलाल, यशवंत सोनकुसरे, सरिता मदनकर, देवचंद ठाकरे, संगीता भोंगाडे, सदाशिव ढेंगे. रितेश वासनिक, महादेव पचघरे, आनंद मलेवार, विजय पारधी, रोहित बुरडे, सुभाष गायधने, सचिन गायधने, शारदा गाढवे, प्रीतीताई शेंडे, आशाताई बोदरे, उमेश भोंगाडे, वंदना सोयाम, वंदना पराते, रेखा हेडाऊ, सुमन मेहर सहित मोठ्या संख्येने महिला बचत गट, तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Related posts