२६ व २७ जुलै ला खासदार प्रफुल पटेल गोंदिया व भंडारा जिल्ह्यात

313 Views

 

गोंदिया। खासदार प्रफुल्ल पटेल भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौरा पुढील प्रमाणे आहे.

सांसद पटेल दि.२६ जुलै २०२४ शुक्रवारला दुपारी १२.३० वाजता वात्सल्य सभागृह, आरेकर काम्प्लेक्स, अर्जुनी मोरगांव, दुपारी ०३.०० वाजता तेजस्वनी लॉन, शेंडा रोड, सड़क अर्जुनी, दुपारी ०५.०० वाजता सौ. पुष्पाताई मानापुरे यांचे निवास स्थान, मुंडीपार, ता. गोरेगांव, येथे आयोजित कार्यकर्ता मेळावाला उपस्थित राहणार आहेत.

तसेच दि. २७ जुलै २०२४ शनिवारला दुपारी ३.०० वाजता शकुंतला हॉल, तुमसर, येथे दुपारी ५.०० वाजता परमात्मा एक भवन, मोहाडी येथे कार्यकर्ता मेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.

खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत जिल्ह्यांतील वरिष्ठ मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी उपरोक्त कार्यक्रमांना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे।

Related posts