लाडकी बहिण योजना: ग्रामीण भागात अर्जाच्या नावाखाली महिलांची आर्थिक लूट सर्रास सुरु- सरपंच चौरागडे

420 Views

सरपंच संगठना ची मांगणी, ऑनलाईन प्रक्रिया करण्याची जवाबदारी ग्राम पंचायत संगणक परिचालक कडे देण्यात यावी..

गोरेगाव- १८ जुलै
तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना मोठी धडपड करावी लागत आहे. ऑनलाईन अर्जाच्या नावाखाली महिलांची कागदपत्रे तयार करण्यासाठी आर्थिक लूट केली जात आहे, तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका या कामात निष्काळजीपणा दाखवत असलेल्या चे दिसुन येत आहे. ऑनलाईन काम करणाऱ्या कडुण व अर्ज भरण्यासाठी ४०० ते ५०० रूपये शुल्क आकारले जात आहे हा सर्व प्रकार गांव खेड्यात ग्रामीण भागात सर्रास सुरू असलेल्याचे दिसून येत आहे.
 मात्र प्रशासनाने अद्यापही त्याकडे लक्ष घातलेले नाही यावर तालुका सरपंच संघटनेने आवाज उठवला असुन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे यांनी प्रशासनाकडे कारवाई ची मागणी केली आहे.
नुकतीच महाराष्ट्र शासनामार्फत संपूर्ण राज्यात लाडकी बहिण योजना लागू करण्यात आली त्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बॅंक पासबुक,जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला व निवडणूक ओळखपत्र व फोटो सोबत ठेवून लाभार्थी ला ऑनलाईन अपलोड करावे लागत आहे. त्यासाठी प्रशासनाने नारी शक्ती दुत ऍप ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महिला घरबसल्या या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकत नाहीत तसेच ग्रामीण भागात नेटवर्क ची समस्या ही एक वेगळीच समस्या बनली आहे, याचा फायदा घेत ऑनलाईन केंद्र संचालक व दलाल महिला कडुण ४०० ते ५०० रूपये घेत आहेत.
विशेष म्हणजे या कामाची जबाबदारी प्रशासनाकडून महिला व बालविकास विभागाकडे देण्यात आली आहे. मात्र बहुतांश गावांमध्ये अंगणवाडी सेविका कडुण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिशिस्तीत महिलांना भटकंती करावी लागत आहे. या योजनेच्या लाभ घेण्यासाठी सगळीकडे लूट सुरू असुन प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
तरी प्रशासनाने ग्रांम पंचायत येतील संघनक परिचालक मार्फत सर्व लाडकी बहिण योजनेचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी नियुक्त करावे व आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र कुमार चौरागडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Related posts