जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ कृत्यामुळे भाजपच्या तिव्र निषेध, केले जोड़े मारो आंदोलन..

465 Views

 

गोंदिया। महाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रम दरम्यान भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या कृतीच्या निषेधार्थ आज गोंदियात भाजपा नेत्यांनी तीव्र आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी भाजपाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फ़ोटो ला जोड़े मारून आणि घोषणाबाजी करून तीव्र निषेध नोंदवला।

गोंदिया शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आव्हाड यांनी संपूर्ण देशाचा अपमान केला आहे. त्यांच्या कृत्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केलीय.

या वेळी भाजपा जिला उपाध्यक्ष संजीव कुलकर्णी, जिल्हा महामंत्री सुनील केलनका, अनुसूचित जाति मोर्चा जिलाध्यक्ष विश्वजीत डोंगरे, धनलाल ठाकरे, मिलिंद बागडे, शंभूशरण ठाकुर अमित झा, जयंत शुक्ला, सुनील तिवारी, रतन वासनिक, अक्षय वासनिक, श्रीकांत चांदूरकर, राकेश अग्रवाल, सतीश मेश्राम, मंगलेश गिरी, गोल्डी गावंडे, रितेश चोरनले, पुरु ठाकरे, नरेंद्र तूरकर, धर्मिष्ठा सेंगर, संजू माने, बाबा बिसेन, जीवन जगनीत आदि उपस्थित होते.

Related posts