गोंदिया: पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते आधुनिक गैस व विद्युत चलित शवदाहिणीचे लोकार्पण..

243 Views

 

गोंदिया। खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया येथील मोक्षधामात १ कोटीच्या निधीतून गॅस व विद्युत चलीत आधुनिक शवदाहिणी मंजुर करण्यात आली होती. या दाहिणीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे आज नगर परिषदेच्या आयोजित सोहळ्याच्या माध्यमातून शवदाहिणीचे लोकार्पण ऑनलाईनने पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, नगर परिषदेचे मुख्यअधिकारी करण चौव्हाण तसेच आदि मान्यवर उपस्थित होते.

शहराच्या विकासाला गतीमान करण्यासाठी खा.श्री प्रफुल पटेल हे सतत प्रयत्न करत राहतात. त्यातच मोक्षधाम येथे आधुनिक शवदाहिणीची मागणी सामाजिक संघटना व शहरवासीयांनी केली होती. दरम्यान खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकार घेवून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शवदाहिणी मंजुर करण्यात आली.

यासाठी १ कोटीची निधी मंजुर करण्यात आला. गोंदिया येथील मोक्षधामात गॅस व विद्युत चलीत अत्याधुनिक शवदाहिणी लोक सेवेसाठी तयार झाली आहे. याकामाचे नुकतेच माजी आ.राजेंद्र जैन यांनी पाहणी देखील केली होती.

आज पालकमंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते शवदाहिणीचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अतिथी म्हणून उपस्थित माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल पटेल व पालकमंत्री आत्राम यांचे शहरवासीयांच्या वतीने आभार मानले.

अत्याधुनिक शवदाहिणीमुळे प्रेत आत्म्यावर अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी येणार्‍या अडचणी दुर होणार असल्याचेही त्यांनी व्यक्त केले.

Related posts