अखेर आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नाला यश, सरकार ने जाहीर केला धानाला ४० हजार रुपये पर्यंत बोनस…

389 Views

 

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार ८१ हजार रुपये पर्यंत शासनाची मदत..

प्रतिनिधी / गोंदिया : महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आमदार विनोद अग्रवाल यांनी धानाला बोनस देण्याची मागणी केली होती सोबतच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून वाढीव मदत शेतकऱ्यांना करण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता ज्याला भरभरून प्रतिसाद नागरिकांनी दिला होता.

आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धानाला प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस जाहीर केला असून २ हेक्टर पर्यंत म्हणजेच ४० हजार रुपये पर्यंतचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.

त्याच बरोबर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ओलीताखाली (बागायती) शेतीसाठी २७ हजार रुपये हेक्टर व बिगर ओलीताखाली (कोरडवाहू) शेतीसाठी १३६०० रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली असून ३ हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे यामुळे ८१ हजार पर्यंतची मदत शेतकऱ्यांना होईल.

धानाला बोनस मिळावा तसेच शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी विधानसभेत आमदार विनोद अग्रवाल यांनी सरकारचे लक्ष वेधले होते. शेतकऱ्यांची साद ऐकल्या बद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे आभार मानले.

Related posts