गोंदिया: श्रीराम मंदिर कामाचे भूमिपूजन माझ्यासाठी भाग्याचे, खा. सुनील मेंढे याचे प्रतिपादन

549 Views

 

गोंदिया: एकीकडे अयोध्येचे प्रभू श्रीरामाचे मंदिर पूर्णत्वास जाऊन लवकरच त्यात रामलला विराजमान होणार आहेत. अशावेळी, गोंदिया येथे श्रीराम मंदिर निर्मितीचा जुळून आलेला मुहूर्त म्हणजे एक अमृत योग आहे. माझ्या हाताने होत असलेल्या भूमिपूजनासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे प्रतिपादन खा. सुनील मेंढे यांनी व्यक्त केले
गोंदिया येथील प्रभाग क्रमांक 12 येथे खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारातून त्यांच्या निधीतून 50 लाख व आ. विनोद अगरवाल यांच्या निधीतून 30 लाख रुपये खर्चून राम मंदिराच्या निर्माण कार्याचे भूमिपूजन आज खा. सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्याच्या वेळी खासदार सुनील मेंढे बोलत होते. साधु संत, देवी, देवता हा आमच्या धर्माचा आधार आहे, आमची श्रद्धा आहे. आमची संस्कृती टिकवून ठेवण्याचे काम याच ठिकाणाहून होते.
राम मंदिराच्या सभागृह भूमीपूजनाचा योग म्हणजे माझ्यासाठी भाग्याचा आहे. अयोध्या राम मंदिरासाठी जी कारसेवा झाली. त्यात माझा सहभाग होता. एकीकडे अयोध्येचे राम मंदिर पूर्णत्वास जात आहे. लवकरच प्रभू रामचंद्र आपल्या मंदिरात विराजमान होत आहेत. गोंदियात राम मंदिराच्या सभागृह निर्मितीचा झालेला मुहूर्त माझ्यासाठी तेवढाच अभिमानाचा विषय असल्याचे तसेच हे मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक राम भक्ताचा हात लागावा म्हणून प्रत्येकाने दातृत्व दाखवावे असे ते म्हणाले.
व्यासपीठावर यावेळी आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार रमेश भाऊ कूथे, दुलीचंद बुद्धे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, संजय कुळकर्णी, सुनील केलंका, कशिश जयस्वाल, जितेंद्र पंचबुद्धे, राज कुमार कूथे, शिव शर्मा, भावना कदम, मौसमी सोन छात्रा, सुनीता तरोने, कुंदा ताई पंचबुद्धे, धर्मेश अग्रवाल, घनश्याम पानतावणे, इंजि अंगुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related posts