न्यू गोंदिया हॉस्पिटल मध्ये रुग्णाचे नातेवाईकाची फसवणुक करणारा भामटा अवघ्या काही तासात जेरबंद..

1,019 Views
गोंदिया। प्रतिनिधि
२३ सेप्ट. रोजी फिर्यादी कमल घोगु मस्करे ५३ वर्षे, रा. चिखली, पोस्ट- बहेला, ता- लांजी, जिल्हा- बालाघाट (म.प्र.) हे न्यु गोंदिया हॉस्पीटल बजरंग नगर, गोंदिया येथे त्याचे ०७ महिने वयाचे नातवंडास उपचाराकरीता भरती केले होते. दिनांक २६ सेप्टबर रोजी एका अनोळखी इसमाने फिर्यादीचे परिचयाचे लोकांची ओळख दाखवुन फिर्यादीचे विश्वास संपादन करुन फिर्यादीच्या मुलीला, तुझ्या वडीलाने दवाखान्याचे बिल भरण्याकरीता तुझ्याकडे दिलेले २५०००/- रु मागीतल्याचे खोटे सांगुन नगदी २५०००/- रु. घेऊन फसवणुक केल्याने फिर्यादीचे तक्रारीवरुन दिनांक ११ / १० / २०२३ रोजी पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे अपराध क्रमांक ६६२ / २०२३ कलम ४२० भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले होते.
पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया संकेत देवळेकर, यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दिलेल्या तपास सूचना निर्देशाप्रमाणे पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशनं गोंदिया शहरचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमलदारांनी घटनास्थळ माहीती तांत्रीक विश्लेषन व गोपणिय सुत्रांचे आधारे आरोपी नामे हिवराज महादेव सुर्यवंशी वय ५२ वर्षे, रा. रेंगेपार, पोस्ट पांढरी, ता. सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया याचा अथक परिश्रमाने शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन चाणक्ष बुध्दीने तपास केला.
त्याचे कडुन नगदी २५०००/- रुपये तसेच गुन्हयात वापरेलेली मोटार सायकल एच.एफ. डीलक्स अं. कि. ६५०००/- रु ची हस्तगत करुन अवघ्या १२ तासाचे आत गुन्हा उघडकीस आणला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा- कवलपालसिंग भाटीया, पोस्टे गोंदिया शहर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक गोंदिया, अशोक बनकर, अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. गोंदिया शहरचे पो. नि. चंन्द्रकांत सुर्यवंशी, स.पो.नि. सागर पाटील, पोहवा कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, जागेश्वर उईके, प्रमोद चव्हाण, सतिश शेन्डे, दिपक राहांगडाले, पो.शि. मुकेश रावते, कुणाल बारेवार, सुभाष सोनवाने, दिनेश बिसेन, अशोक रहांगडाले यांनी केलेली आहे.

Related posts