गोंदिया: पत्रकारांची लेखणी समाजाला दिशा देणारी : आ. विनोद अग्रवाल

392 Views

प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिवस व सत्कार सोहळा..

गोंदिया: आजघडीला सोशल मीडियातून अनेक बातम्या व माहिती जलद गतीने प्राप्त होत असते मात्र त्यात विश्वसनीयतेचा अभाव असतो. अनेक आव्हानांना तोंड देत पत्रकारांनी विशेषतः प्रिंट मीडियाने आपली विश्वसनीयता व खरेपणा आज ही कायम ठेवलेला आहे. शासन, प्रशासन व समाजाला दिशा देण्याचे महत्वाचे कार्य पत्रकार आपल्या लेखणीतून सकारात्मक पद्धतीने निरंतर करीत आहेत, असे प्रतिपादन आ. विनोद अग्रवाल यांनी केले.

ते १ सप्टेंबर रोजी हॉटेल जिंजर (द गेटवे) येथे आयोजित प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाचा ८ वा स्थापना दिन व सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणुन बोलत होते.


प्रेस ट्रस्ट ऑफ गोंंदियाचे अध्यक्ष अपूर्व मेठी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश पाटील, सचिव रवी आर्य उपस्थित होते.
पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया चे कार्य स्तुत्य असुन समाजाला काही देणे आहे या भावनेतून चांगले कार्य करणाऱ्यांची निवड करुन त्यांना व समाजाला प्रोत्साहन देण्याचे कार्य ते सतत करीत आहेत. जिल्हयात पत्रकार भवन व्हावे यासाठी मी सदैव सोबत असून त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी आपल्या संबोधनातून सांगितले की पत्रकारांनी आपले कर्तव्य बजावताना माध्यमातुन टीका करायलाच पाहिजे प्रशासनाला ते सुद्धा महत्वाचे आहे. त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या. माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रेस वर समाज ट्रस्ट करतो मात्र येथील मोठाले लोकप्रतिनिधी व प्रशासन 24 वर्षात पत्रकार भवन तयार करुन देऊ शकली नाही. आम्ही नगर परिषद मध्ये ठराव घेऊन जागा दिलेली आहे, आता प्रशासन व लोकप्रतिनिधींनी हे काम पुढे घेऊन जावे. पत्रकारांना सुद्धा त्यांनी संदेश देत आपली कर्तव्ये चोखपणे बजावण्याचे सांगितले. अपूर्व मेठी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारांच्या व्यवसायातील अडचणी व संघर्ष यावर बोलून प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या वाटचालीबद्दल सांगितले. सभापती पूजा सेठ यांनी सुद्धा शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक करताना सचिव रवी आर्य यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदिया ची स्थापना, उद्देश, केलेले कार्य व भविष्यातील कार्य योजनेची माहिती दिली.
यावेळी प्रेस ट्रस्ट ऑफ गोंदियाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार लाटा यांना सन्मानित करण्यात आले. तर स्व.रणजितभाई जसानी स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव सामाजिक सेवा पुरस्कार पर्यावरण व प्राण्यांसाठी सेवाकार्य करणारे रघुनाथ भुते यांना, स्व.रामकिशोर कटकवार स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कर्तव्यनिष्ठ पुरस्कार समग्र शिक्षा अभियानाचे कार्यकारी अभियंता जिवनेश मिश्रा यांना, स्व. रामदेव जायस्वाल स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कला व साहित्यरत्न पुरस्कार योगिता दिनेश मौजे यांना, स्व.मोहनलाल चांडक स्मृति प्रित्यर्थ जिल्हा गौरव कृषीरत्न पुरस्कार त्रिवेणी गोविंद तुरकर यांना, सहयोग संस्थेतर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा गौरव पुरस्कार शिक्षक मंगलमूर्ती सयाम यांना, स्व. प्रा. योगेश नासरे यांच्या स्मृतीत क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हयातील प्रसिध्द धावक मुन्नालाल यादव यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, गौरव चिन्ह, प्रमाणपत्र व धनादेश हे पुरस्काराचे स्वरूप होते. विशेषत्वाने 81 वर्षीय मुन्नालाल यादव यांना दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरीता अकरा हजाराचा धनादेश देण्यात आला. या वर्षीचा विशेष पुरस्कार समाजात निरंतर पर्यावरण संवर्धन व व्यायामासाठी जनजागृती करणाऱ्या सायकलिंग संडे गृप ला देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मंजू कटरे, रवि सपाटे व त्याच्या चमुने स्वीकारला. यावेळी कार्यक्रमात प्रामुख्याने अमर वऱ्हाळे, विजयजित वालिया, जयदीप जसानी, डॉ. माधुरी नासरे, रोशन जायस्वाल, डॉ. नीरज कटकवार, अशोक चांडक, डॉ. दिलीप संघी, छैलबिहारी अग्रवाल, सविता बेदरकर, भालचंद्र ठाकुर, डॉ गजानन डोंगरवार, रत्नदीप दहीवले, डॉ प्रशांत कटरे, जे के लोखंडे, भीकम शर्मा, के के गजभिये, सावन बहेकार, संजय जैन, दिपक कदम, धर्मिष्ठा सेंगर, अजय श्यामका आदि जिल्हयातील गणमान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उपाध्यक्ष जयंत शुक्ला यांनी केले. सत्कारमूर्ती चे परिचय वाचन राजन चौबे यांनी तर आभार नरेश रहीले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष शर्मा, हिदायत शेख, अंकूश गुंडावार, जावेद खान, हरींद्र मेठी, कपिल केकत, प्रमोद नागनाथे, मुकेश शर्मा, भरत घासले, आशिष वर्मा, योगेश राऊत, दिपक जोशी, सौ.अर्चना गिरी, बिरला गणवीर, रवींद्र तुरकर, संजीव बापट आदिंनी परिश्रम घेतले.

Related posts