83,313 Viewsगेल्या काही दिवसांपासून योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीनं तयार केलेल्या कोरोनिल या औषधावरून वाद निर्माण झाले होते. आयुष मंत्रालयानं कोरोनिल या औषधाच्या जाहिरातीवर बंदी घातली होती. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर काही ठिकाणी बाबा रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज (बुधवार) बाबा रामदेव यांनी कोरोनिलवर स्पष्टीकरण दिलं. दरम्यान, हे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. जर रोगमुक्त भारत करणं हा गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार, असंही ते म्हणाले. दरम्यान, आयुष मंत्रालयाला संपूर्ण अहवालही सोपवल्याचं…
Read Moreगोव्यात उद्यापासून पर्यटनाला सुरुवात, पण…
45,590 Viewsगोवा म्हणजे पर्यटनाचं केंद्रच! त्यामुळे गोव्यातील समुद्र किनारे आणि पर्यटन स्थळ आणि हॉटेल्स नेहमी देशातील विदेशातील पर्यटकांनी गजबलेल्या असायच्या. पण करोनाच्या विषाणूनं करोना शांत, बंदिस्त होऊन गेला आहे. मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर गोव्यातील पर्यटनासाठी दरवाजे बंद झाले. दरम्यानच्या काळात गोवा करोनामुक्तही झाला. पण, प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर करोना पुन्हा गोव्यात दाखल झाला. अखेर या पाठशिवणीच्या खेळानंतर गोव्यातील पर्यटनाचे दरवाजे उद्यापासून खुले होत आहेत. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी विषयीची माहिती दिली. एकदा करोनामुक्त होऊनही पुन्हा करोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याची घोषणा केली.
Read Moreपडळकरांचे दोनदा डिपॉझिट गेलेय, काय महत्व द्यायचे? शरद पवारांनी शेलक्या शब्दांत फटकारले
1,319 Viewsसातारा : शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले होते. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच नाही तर भाजपाच्या नेत्यांनीही या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादीने यावर राज्यभर आंदोलने केली. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. सातारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आले आहेत. यावेळी भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दोघांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी शरद पवार यांनी पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यावर शेलक्या शद्बांत टीका केली. मला नाही वाटत त्याला काही…
Read Moreसलग १० ते १२ वर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना वगळून महावितरणमध्ये मेगाभरती
33,197 Viewsपुणे : कंत्राटी पद्धतीने हजारो कामगार सलग १० ते १२ वर्षे काम करत असताना त्यांना बाजूला ठेवून महावितरण कंपनीने ७ हजार पदांवर नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने याला विरोध केला आहे. या भरतीत आधीच कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना या नोकरभरतीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.२३ जूनला महावितरण कंपनी ७ हजार पदांवर भरती करणार आहे असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर केले. त्यात कंत्राटी कामगारांचा उल्लेखही नाही. भारतीय मजदूर संघ या देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनेबरोबर संलग्न असलेल्या कंत्राटी कामगार संघाचे राज्य अध्यक्ष नीलेश…
Read Moreजि.प.पदाधिकार्यांचा कार्यकाळ मुदतवाढीचा सर्वसाधारण सभेत ठराव
34,705 Viewsगोंदिया,दि.29ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत सर्वच पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांनी आपला सहा महिन्याचा कार्यकाळ वाढावा यासाठी शासनाकडे मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव सर्वसमंतीने पारित करुन पाठविण्याचा निर्णय घेतला.मात्र गेल्या काही महिन्यात बांधकाम विभागातील घोटाळे,दुकानगाळे घोटाळ्यासह इतरावंर सर्वच सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या जिल्हापरिषद सदस्यांनी चुप्पी साधल्याने तत्कालीन सेवानिवृत्त अति.मुकाअ व बांधकाम सभापतीनी नियमबाह्य कामाला मुकसमंतीच दिल्याचे दिसून आले.सर्वसाधारण सभेत जिल्हापरिषदांचा शाळा सुरु करण्यापुर्वी निर्जुंतुकीकरण केल्यानंतरच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेत यासाठी आपत्ती निवारण विभागाकडून निधीची मागणी करण्याचा ठराव घेण्यात आला.तर ज्या शाळात अद्यापह नागरिक…
Read More


