61 Views गोंदिया। खासदार श्री प्रफुल पटेल यांनी गोंदिया येथील निवासस्थानी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी तात्काळ दखल घेत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांचे निराकरण केले. तसेच प्रलंबित असलेल्या प्रश्नांना लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अनेक महत्त्वाच्या समस्या व नागरिकांच्या व्यथा, जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित निरसन करणे हेच आपले कर्तव्य आहे असे त्यांनी दाखवून दिले.
Read More