नवेगाव-नागझिरा बफर झोन वाढविण्याचा प्रस्ताव नाही; काही क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रश्नावर वनमत्र्यांची ग्वाही

35 Views  भंडारा :- भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील बफर झोन वाढविण्याचा सध्या कोणताही विचार नसून, काही क्षेत्र कमी करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल, अशी ग्वाही वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली. आमदार डॉ. परिणय फुके यांनी या विषयाकडे सभागृहात लक्ष वेधले होते. 26 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आलेल्या जीआरनुसार बफर क्षेत्राचे व्यवस्थापन व्याघ्र प्रकल्पाकडे वर्ग करण्यात आले. मात्र या निर्णयानंतर 185 गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आमदार डॉ. फुके यांनी निदर्शनास आणले. युनिफाईड कंट्रोल…

Read More