आमगावसह भंडारा, तुमसर रेल्वे स्थानकाचे होणार कायापालट, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित

981 Views  गोंदिया : केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने देशातील रेल्वे स्टेशन अधिक सुविधायुक्त होवून आधुनिक व्हावे, यासाठी अमृत भारत स्टेशन योजना हाती घेतली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गोंदिया रेल्वेस्थानकाचा समावेश करण्यात आला होता. त्याचबरोबर भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील इतर रेल्वेस्थानकांचेही कायापालट व्हावे, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी प्रयत्न केले. दरम्यान या योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व भंडारा येथील वरठी तसेच तुमसर रेल्वे स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. यानुरूप रेल्वे प्रशासनाने तिन्ही स्थानकांचा कायापालट करण्याचे नियोजनही केले आहे. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील जनतेचा रेल्वे प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे.…

Read More

गोंदियासह पूर्व-विदर्भ क्षेत्रात वादळी पावसाची शक्यता, हवामान तज्ज्ञांचा अंदाज

1,411 Views          मुंबई, दि.23 : पूर्व विदर्भ क्षेत्रात 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळाची शक्यता आहे.  मुख्यत: सोमवार दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारनंतर हवामानातील बदल अपेक्षीत आहे. या तीन जिल्ह्यांसह भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड आणि अमरावती जिल्ह्याच्या पूर्व भागातही वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या भागांत गारपीटाचीही शक्यता आहे. असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read More